चासकमान धरण १00 टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:36 AM2018-08-12T00:36:13+5:302018-08-12T00:36:24+5:30

चासकमान धरण १०० टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून सकाळी सहा वाजता चासकमान धरणाचे पाचही दरवाजे ५० सेंटिमीटरनी उघडून सांडव्याद्वारे १,८५० क्युसेक्स वेगाने भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Chasmman dam completes 100 percent | चासकमान धरण १00 टक्के भरले

चासकमान धरण १00 टक्के भरले

Next

चासकमान : चासकमान धरण १०० टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून सकाळी सहा वाजता चासकमान धरणाचे पाचही दरवाजे ५० सेंटिमीटरनी उघडून सांडव्याद्वारे १,८५० क्युसेक्स वेगाने भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. डाव्या कालव्याद्वारे ८५० असे एकूण २,७०० क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सोडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिली.
तसेच चासकमान धरण पाणलोटक्षेत्रात सरासरी एकूण ४४५ मिलिमीटरइतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात विशेषत: सह्याद्रीच्या डोंगररांगांवर मागील महिन्यात संततधार पाऊस झाल्याने चासकमान धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे ८.७५ टीएमसी क्षमता असलेले चासकमान धरण २१ जुलैला ९६.९० टक्के भरल्याने ५२७५ क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आला होता.
मागील दोन आठवड्यात पावसाने चासकमान धरण पाणलोटक्षेत्रात दडी मारल्याने धरणाच्या पाणलोटक्षेत्रात येणारी आवक बहुतांशी प्रमाणात थांबल्याने चासकमान धरणात ९७.५९ टक्के भरून धरणाचे पाचही दरवाजे २७ जुलैला संध्याकाळी ४ वाजता बंद करण्यात आले होते. परंतु कळमोडी परिसरासह भीमनेर खोऱ्यात अधूनमधून पडणाºया पावसाने पश्चिम भागातील भीमा नदीबरोबरच एकलहरे, शिरगाव, धामणगाव, भोरगिरी, पाबे, आव्हाट, वाळद, खरोशी, मंदोशी, वाडा, वाळद आदींसह अनेक गावांतील ओढे-नाल्याबरोबरच भातखाचरातील पाणी खळाळून वाहत आहे. त्यामुळे चासकमान धरणात पाण्याचा विसर्ग कमी जास्त प्रमाणात होत आहे.


चासकमान धरण ५ आॅगस्टला सकाळी शंभर टक्के भरले. मागील वर्षी धरण १४ आॅगस्टला भरले होते.

परंतु शनिवारी सकाळपासून धरण पाणलोटक्षेत्रात पाऊस सक्रिय झाला असल्याने धरणाचे आज पुन्हा पाचही दरवाजे उघडण्यात आले.

सध्या चासकमान धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला असून पाणीपातळी ६४९.५३ मीटर एकूण साठा २४१.६९ दलघमी आहे, तर उपयुक्त साठा २१४.५० दलघमी आहे.

Web Title: Chasmman dam completes 100 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.