डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 'पीएमपी' बसमार्गांमध्ये बदल

By भाग्यश्री गिलडा | Published: April 12, 2024 08:23 PM2024-04-12T20:23:00+5:302024-04-12T20:23:38+5:30

पुणे स्टेशन जवळील बोल्हाई चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्णहार अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी होते

Changes in PMP bus routes on the occasion of dr Babasaheb Ambedkar Jayanti | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 'पीएमपी' बसमार्गांमध्ये बदल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 'पीएमपी' बसमार्गांमध्ये बदल

पुणे : भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पीएमपीच्या काही बसमार्गांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. पुणे शहर तसेच उपनगरांत मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तसेच पुणे स्टेशन जवळील बोल्हाई चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्णहार अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी होत असल्याने रविवारी (दि. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थानक, ससून रोड व मोलेदिना बस स्थानक येथून सुटणाऱ्या बसेस पेटीट बस स्थानक (पुणे स्टेशन आगार) येथून सुटतील व परतीच्या वेळी बंडगार्डन कडून येताना वाडीया कॉलेज, अलंकार चौक व पेटीट बस स्थानक (पुणे स्टेशन आगार) असे संचलनात राहतील. सदरचा बदल हा पोलीस खात्याच्या आदेशानुसार करण्यात आलेला असलायची माहिती महामंडळाने दिली आहे.

बदल खालीलप्रमाणे 

- २९, १४८, १४८अ, २०१ या मार्गाच्या बसेस जाता येता साधु वासवानी चौक, अलंकार चौक व पुढे नेहमीप्रमाणे संचलनात राहतील.
- ३, ५, ६, ३९, ५७, १४०, १४०अ, १४१ या मार्गाच्या बसेस पुणे स्टेशनकडे जातेवेळेस नरपतगीर चौकातून अथवा के. ई. एम. हॉस्पिटल जवळून उजवीकडे वळून एम्प्लॉयमेंट ऑफिस, लालदेऊळ व पुढे पुणे स्टेशन डेपो स्थानकामधून संचलनात राहतील व परतीच्या वेळी त्याच मार्गाने संचलनात राहतील. मात्र जास्त गर्दी होऊन रस्ता बंद झाल्यास सदर मार्गाची वाहतुक नरपतगीर चौकातून करणेत येईल.
- २४, २४अ, ३१, २३५, २३६ या मार्गाच्या बसेस पुणे स्टेशनकडे जातेवेळेस नरपतगीर चौक अथवा के.ई.एम. हॉस्पिटल चौकातून रास्तापेठ पॉवर हाऊस, एम्प्लॉयमेंट ऑफिस जवळून लाल देऊळ, पोलीस मुख्यालय व पुढे नेहमीच्या मार्गाने जातील. मात्र परतीच्या वेळी तूर्त याच मार्गाने संचलनात राहतील. 
- ८, ८१, ९४, १०८, १४३, १४४, १४४अ, १४४क, २८३ या मार्गाच्या बसेस पुणे स्टेशनकडे जाताना नरपतगीर चौक अथवा के.ई.एम.हॉस्पिटल चौकातून एम्प्लॉयमेंट ऑफिस मार्गे लाल देऊळ, पोलीस मुख्यालय, सरळ पुढे पुणे स्टेशन डेपोतून वळवून जी.पी.ओ. पासून सोडण्यात येतील व पुढे नेहमीच्या मार्गाने संचलनात राहतील. (रास्तापेठ पॉवर हाऊस मार्गे)
- १४२, १४५, १४६ या मार्गाच्या बसेस पुणे स्टेशनकडे जाता-येता पेटीट इस्टेट स्थानकावरून सुटून जी.पी.ओ., लाल देऊळ, जिल्हा परिषद चौक, गाडीतळ मार्गे नेहमीच्या मार्गाने संचलनात राहतील.
- ८६, ९८, १०२, १३१, १३२, १३३, १३३अ, १३५, १३७, १४७, १५८, १५९, १५९ब, १६२, १६४, १६५, १६९, २३४, २३७ या मार्गाच्या बसेस जुना बाजार, गाडीतळ चौकानंतर गाडीतळ, लाल देऊळ, कमिशनर ऑफिस व पुढे नेहमीच्या मार्गाने  संचलनात राहतील.

Web Title: Changes in PMP bus routes on the occasion of dr Babasaheb Ambedkar Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.