‘त्या’ने अंगावर घातली गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 01:29 AM2018-10-18T01:29:54+5:302018-10-18T01:30:13+5:30

पुणे : सिग्नल तोडल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुचाकीस्वराने वाहतूक पोलिसाच्या अंगावरच गाडी घातली. ही घटना डेक्कन येथील ...

car rams on traffic police | ‘त्या’ने अंगावर घातली गाडी

‘त्या’ने अंगावर घातली गाडी

googlenewsNext

पुणे : सिग्नल तोडल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुचाकीस्वराने वाहतूक पोलिसाच्या अंगावरच गाडी घातली. ही घटना डेक्कन येथील गुडलक चौकात मंगळवारी रात्री घडली. अक्षय जयसिंग जाधव (वय २५, रा. बिबवेवाडी) याला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे.


महिला पोलीस नाईक मनीषा वायसे यांनी फिर्याद दिली आहे. त्या गुडलक चौकात सहकारी हवालदार उकरंडे यांच्यासमवेत वाहतूक नियमन करीत होत्या. आरोपी अक्षय याने सिग्नल तोडून भरधाव वेगात पळायचा प्रयत्न केला. मात्र, मनीषा यांनी त्याला समोर थांबून अडवले असता, त्याने त्यांच्या अंगावर गाडी घातली. यानंतर त्याला नियमाबद्दल सांगत असताना त्याने वाद घालून सरकारी कामात अडथळा आणला.

वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की :
कागदपत्रे मागितल्याचा राग आला म्हणून वाहतूक पोलिसाला धकबुक्की करण्यात आली. ही घटना कोंढवा येथे शीतल पेट्रोलपंपाजवळ घडली. दुचाकीवरील तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी चंद्रभान संकपाळ हे कोंढवा वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. त्यांना एक व्यक्ती दुचाकीवर मोबाईलवर बोलत जाताना आढळली. यामुळे त्यांनी त्याला थांबवून कागदपत्रांची मागणी केली.
मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे देत त्याच्या दोन मित्रांना तिथे बोलावून घेतले. यानंतर तिघांनीही फिर्यादीला दमदाटी करून त्यांच्याशी झटापट केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: car rams on traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.