The builder, Devendra Shah, fired in the hospital and fired | बांधकाम व्यावसायिक देवेंद्र शहा यांच्यावर गोळीबार, हॉस्पिटलमध्ये दाखल

पुणे : बांधकाम व्यावसायिक देवेंद्र शहा यांच्यावर अज्ञातांनी आज रात्री साडे अकरा वाजता गोळीबार केला असून, त्यांना दोन गोळ्या लागल्या आहेत. प्रभात रोडवरील गल्ली क्रमांक ७ मध्ये सायली अपार्टमेंटमध्ये त्यांचे घर आहे. या ठिकाणी रात्री साडेअकरा वाजता हा प्रकार घडला. शहा यांना जखमी अवस्थेत पूना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबार करणारे कोण होते आणि हा प्रकार कसा घडला, याबाबत अद्याप माहिती कळू शकलेली नाही.