Budget 2019: मेट्रोसाठी अंदाजपत्रकात भरघोस तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 02:43 AM2019-02-02T02:43:56+5:302019-02-02T02:44:12+5:30

केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास खात्यासाठी सन २०१९-२० अर्थसंकल्पात एकूण १७ हजार ७१३ कोटी ९३ लाख एवढी रक्कम मंजूर केली असून त्यातूनच देशातील सर्व मेट्रो प्रकल्पांना अर्थसाह्य करण्यात येणार आहे.

Budget 2019: Budget provision for metro budget | Budget 2019: मेट्रोसाठी अंदाजपत्रकात भरघोस तरतूद

Budget 2019: मेट्रोसाठी अंदाजपत्रकात भरघोस तरतूद

Next

पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील सर्व मेट्रो प्रकल्पासाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास खात्यासाठी सन २०१९-२० अर्थसंकल्पात एकूण १७ हजार ७१३ कोटी ९३ लाख एवढी रक्कम मंजूर केली असून त्यातूनच देशातील सर्व मेट्रो प्रकल्पांना अर्थसाह्य करण्यात येणार आहे. महामेट्रोच्या पुणे विभागाच्यावतीने ही माहिती देण्यात आली.

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी सन २०१९-२० या वर्षाकरिता २ हजार १० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. याआधीच्या वर्षासाठी १ हजार ३२२ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यातील बराचसा निधी मिळाला असून पुणे मेट्रोचे काम एकूण २७ टक्के झाले असल्याची माहिती पुणे विभागाच्या वतीने देण्यात आली. केंद्र सरकारचे सर्वच मेट्रो प्रकल्पांकडे लक्ष असून निधी वेळेवर व नियमितपणे उपलब्ध करून दिला जात असल्याचे सांगण्यात आले.

सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी याच अर्थसंकल्पात १४ हजार ८६४ कोटी ६० लाख कोटी एवढी तरतूद केली होती. त्यातूनच देशातील सर्व मेट्रो प्रकल्पांना त्यांना सुरुवातीच्या कामासाठी लागत असलेला निधी देण्यात आला. यावर्षी २० टक्के जादा निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पांना निधीही जास्त मिळणार आहे.

Web Title: Budget 2019: Budget provision for metro budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.