मेट्रोच्या कामामुळे नगर रस्त्यावरील बीआरटी बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 01:10 PM2018-11-17T13:10:33+5:302018-11-17T13:19:10+5:30

बसचे संचलन मुख्य रस्त्यावरून होणार असून त्यासाठी बसथांबे उभारण्यात आले आहेत,

BRT on nagar road will be closed Due to Metro work | मेट्रोच्या कामामुळे नगर रस्त्यावरील बीआरटी बंद

मेट्रोच्या कामामुळे नगर रस्त्यावरील बीआरटी बंद

ठळक मुद्देयेरवडा ते वडगाव शेरीदरम्यान मेट्रोचे काम १८ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार

पुणे : मेट्रोचे काम सुरू होणार असल्याने नगर रस्त्यावरील येरवडा ते विमाननगर कॉर्नर या बीआरटी मार्गावरून बस संचलन बंद करण्यात येणार आहे. दि. १८ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. बसचे संचलन मुख्य रस्त्यावरून होणार असून त्यासाठी बसथांबे उभारण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रशासनाकडून देण्यात आली. 
वनाझ ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे काम प्रगती पथावर आहे. याअंतर्गत सध्या रस्त्यावरील काही भाग आरक्षित करून काम केले जात आहे. नगर रस्त्यावरील येरवडा ते विमाननगर कॉर्नर या दरम्यान महामेट्रोमार्फत मेट्रो मार्गाचे काम दि. १८ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. या कामामुळे येरवडा चौक ते विमाननगर कॉर्नर यादरम्यान बीआरटी मार्गवरील बस संचलन बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे ही सेवा मुख्य रस्त्याने पुरविली जाईल. या तीन किलोमीटर अंतरातील येरवडा, गुंजन कॉर्नर, वाडीया बंगला, शास्त्रीनगर, रामवाडी जकात नाका, वडगाव शेरी फाटा हे बीआरटी थांबे बाधित होणार आहेत. वडगाव शेरी ते आपले घर या अंतरातील बस संचलन पुर्ववत बीआरटी मार्गातूनच करण्यात येईल, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

Web Title: BRT on nagar road will be closed Due to Metro work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.