नीरा नदीवरील पुलाचे कठडे तुटले

By Admin | Published: July 6, 2015 04:17 AM2015-07-06T04:17:50+5:302015-07-06T04:17:50+5:30

वालचंदनगर-नातेपुते रस्त्याच्या नीरा नदीवरील पुलाचे संरक्षक कठडे तुटल्याने येथील वाहतूक धोकादायक झाली आहे. कठडे बसवण्याबाबत शासनाकडून दुर्लक्ष होत आहे.

The bridges of the bridge on the river Nira were broken | नीरा नदीवरील पुलाचे कठडे तुटले

नीरा नदीवरील पुलाचे कठडे तुटले

googlenewsNext


कळंब : वालचंदनगर-नातेपुते रस्त्याच्या नीरा नदीवरील पुलाचे संरक्षक कठडे तुटल्याने येथील वाहतूक धोकादायक झाली आहे. कठडे बसवण्याबाबत शासनाकडून दुर्लक्ष होत आहे. हा रस्ता प्रवासासाठी संरक्षक कठडे नसल्याने धोकादायक बनला
आहे. त्यामुळे नागरिक व प्रवाशी वर्गात नाराजी आहे.
वालचंदनगर ते नातेपूते हा वीस किलोमीटर अंतर असणारा रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्यावर कळंब येथील नीरा नदीवरील पुलाचे संरक्षक कठडे काही वर्षांपासून चोरीस गेले आहेत. शासनाकडून नवीन कठडे बसवण्याबाबतउदासिनता दिसून येत आहे. हा रस्ता रहदारीचा आहे. या रस्त्यावर लांब पल्ल्याच्या एसटी बस दररोज कराड, कोल्हापूर, सांगली आदी ये-जा करत असतात.
तसेच, या रस्त्यावरून हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी वालचंदनगर व कळंबमध्ये एसटी बसने प्रवास करतात. हा रस्ता प्रवासासाठी संरक्षक कठडे नसल्यामुळे धोकादायक बनला आहे.
या पुलावरून पाणी वाहत असताना कठडे नसल्यामुळे मोटारसायकल, जीप अशी वाहने वाहून गेली आहेत. त्यामुळे या पुलाचे संरक्षक कठडे बसविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
(वार्ताहर)

Web Title: The bridges of the bridge on the river Nira were broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.