‘लिव्ह इन’मध्ये वाढताहेत ब्रेकअप; तीन वर्षांत १५०० तक्रारअर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 03:32 AM2018-04-21T03:32:04+5:302018-04-21T03:32:04+5:30

गेल्या काही वर्षांमध्ये उच्चशिक्षित तरुण-तरुणींचे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणत्याही बंधनात न अडकता स्वेच्छेने एकत्र राहण्याचा पर्याय म्हणून या रिलेशनशिपकडे पाहिले जात असले तरी या नात्यामध्येही आता कुरबुरी वाढू लागल्या आहेत.

 Breaking up with live life; In the last three years, 1500 complaints | ‘लिव्ह इन’मध्ये वाढताहेत ब्रेकअप; तीन वर्षांत १५०० तक्रारअर्ज

‘लिव्ह इन’मध्ये वाढताहेत ब्रेकअप; तीन वर्षांत १५०० तक्रारअर्ज

googlenewsNext

- नम्रता फडणीस

पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये उच्चशिक्षित तरुण-तरुणींचे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणत्याही बंधनात न अडकता स्वेच्छेने एकत्र राहण्याचा पर्याय म्हणून या रिलेशनशिपकडे पाहिले जात असले तरी या नात्यामध्येही आता कुरबुरी वाढू लागल्या आहेत. ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणाऱ्या महिलांनाही कौटुंबिक हिंसाचार कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्याने पुणे जिल्हा न्यायालयाकडे गेल्या तीन वर्षांत तब्बल १५00 तक्रारअर्ज प्राप्त झाले आहेत.
नोकरी किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी राहण्याचे स्वातंत्र्य त्या तरुणींना कुटुंबाकडून मिळू लागले आहे. लग्न न करताही एकत्र राहण्यामध्ये तरुणींनाही आता काहीच वावगे वाटत नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये उच्चशिक्षित तरुणी लग्न न करता जोडीदाराबरोबर एकत्र राहण्याचा पर्याय निवडू लागल्या आहेत. आपली मुलगी कुणाबरोबर राहते याचा कुटुंबीयांनादेखील पत्ता नसल्याची वस्तुस्थितीदेखील पाहायला मिळत आहे. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला एकत्र राहाण्यास भाग पाडल्याच्या कहाण्याही आहेत. २00५मध्ये कौटुंबिक हिंसाचार कायदा अस्तित्वात आला तेव्हा ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणाºया महिलांचाही या कायद्यात समावेश केला.
एकाच छताखाली जर स्त्री-पुरुष राहत असतील आणि पुरुषाने महिलेवर हिंसाचाराचे कृत्य केले तर तिलाही न्याय मागण्याचा अधिकार दिला आहे. तसेच २00६ मध्ये
‘लिव्ह इन’मध्ये राहणाºया महिलेला जर मूल झाले तर तिच्या
मुलालाही त्या व्यक्तीच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळू शकतो अशी तरतूद केली असल्याने या कायद्याचा आधार घेत आता ‘लिव्ह इन’मध्ये राहत असलेल्या तरुणीही तक्रारी देऊ लागल्या आहेत. जिल्हा न्यायालयामध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रारींचे प्रमाण वाढत असून, तीन वर्षांमध्ये जवळपास १५00 तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची माहिती अ‍ॅड. माधवी परदेशी
यांनी दिली.

‘लिव्ह इन’मध्ये राहण्याची कारणे
- दोघांनाही स्पेस मिळते.
- जबाबदारी नसते.
- एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घेता येतात.
- एक मानसिक आधार मिळतो.
- सोबतीची गरज असते.
- कुणीतरी शेअर करणारे हवे असते.
४ लग्नापूर्वी समजून घेता येते.

पुणे जिल्हा न्यायालयामध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रारींचे प्रमाण वाढत असून, तीन वर्षांमध्ये जवळपास १५00 तक्रारी प्राप्त झाल्या
आहेत.

गेल्या काही
वर्षांमध्ये उच्चशिक्षित तरुणी लग्न न करता जोडीदाराबरोबर एकत्र राहण्याचा पर्याय निवडू लागल्या
आहेत.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये होतो तेच बरे होतो
आम्ही सहा वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो; पण समाजाच्या दबावामुळे आम्ही लग्न केले. मात्र लग्नानंतर आम्ही खूप मोठी चूक केली याची जाणीव झाली. बॉयफ्रेण्ड नवरा झाला की बदलतो आणि त्याचा त्रास व्हायला लागतो. नऊ ते पाच नोकरी करायची, घर दोघं चालवत असल्यामुळे पैसे घरी द्यायचे, शॉपिंग जास्त करायची नाही. विशिष्ट वेळेलाच जेवण बनवायचे. एका बंधनात बांधून घेतल्यासारखे वाटले. मी असे जीवन जगू शकत नाही म्हणून मग आम्ही घटस्फोट घेतला.
- महिला

घरापासून लांब राहणारी उच्चशिक्षित तरुण-तरुणींचे ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्यामध्ये नवरा-बायकोचे नाते नसले तरी ते नवरा-बायकोसारखेच एकमेकांबरोबर राहतात. अनेक वेळा तरुणी किंवा महिलांना या नात्यामध्ये नैराश्य येते. मग कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा आधार घेत पुरुषाविरोधात त्या तक्रार दाखल केल्या जातात. कौटुंबिक हिंसाचार कायद्यामध्ये ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही गोष्ट मान्य करण्यात आली असल्याने तक्रारींच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे.
- माधवी परदेशी,
वकील, कौटुंबिक न्यायालय

Web Title:  Breaking up with live life; In the last three years, 1500 complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे