बोपखेल, चक्रपाणी, वैदूवस्ती अनुसूचित जमातीसाठी आरक्षित

By admin | Published: October 5, 2016 01:09 AM2016-10-05T01:09:02+5:302016-10-05T01:09:02+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत येत्या शुक्रवारी होणार आहे. सोडतीपूर्वी दोन दिवस अगोदरच अनुसूचित जातींचे २० आणि जमातींचे ३ प्रभाग कोणते असतील

Bopkhel, Chakrapani, Vaidewastha Scheduled Tribes | बोपखेल, चक्रपाणी, वैदूवस्ती अनुसूचित जमातीसाठी आरक्षित

बोपखेल, चक्रपाणी, वैदूवस्ती अनुसूचित जमातीसाठी आरक्षित

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत येत्या शुक्रवारी होणार आहे. सोडतीपूर्वी दोन दिवस अगोदरच अनुसूचित जातींचे २० आणि जमातींचे ३ प्रभाग कोणते असतील, याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. दिघी बोपखेल, भोसरी चक्रपाणी वसाहत, वैदूवस्ती पिंपळे गुरव हे प्रभाग अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असणार आहेत. उर्वरित अनुसूचित जमातींचे वीस प्रभाग भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या विधानसभांत असणार आहे. सर्वाधिक प्रभाग हे पिंपरीत आणि त्यानंतर चिंचवड आणि भोसरीत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच प्रारूप प्रभाग आराखडा फुटल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये जुंपली आहे. चोराच्या उलट्या बोंबा, हा आरोप भाजपा आणि राष्ट्रवादी एकमेकांवर करीत आहे. प्रभागरचनेचा आराखडा फुटल्याचे वृत्त लोकमतने सर्वप्रथम प्रकाशित केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि प्रशासकीय वर्गात खळबळ उडवून दिली होती. आरक्षणांची सोडत ही शुक्रवारी होणार आहे. मात्र, अनुसूचित जाती आणि जमातींच्या २३ प्रभागांची माहिती मिळाली आहे. ही आरक्षणे अंतीम असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. याबाबत अधिकृत घोषणा शुक्रवारी होणार आहे.
बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार १२८ वॉर्डांत चार याप्रमाणे ३२ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी २३ जागांची आरक्षणे कोणत्या प्रभागात असतील, ही माहिती लोकमतला मिळाली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत अनुसूचित जमातींच्या तीन जागा असून, ४, ६,२९ हे प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत. अनुसूचित जातींसाठी १,४,८,९,१०,११,१३,१६,१९,२०,२१,२३,२४,२५,२६,२७,२८,३०,३१,३२ हे प्रभाग आरक्षित असणार आहेत.
दिघी बोपखेलमधील चार जागांपैकी एक जागा अनुसूचित जाती आणि एक जागा
अनुसूचित जमातीसाठी एक जागा नागरिकांचा मागासवर्ग आणि एक जागा खुल्या वर्गासाठी आरक्षित असणार आहे.  

आरक्षित झालेले प्रभाग
अनुसूचित जमातींचे प्रभाग
१) दिघी, बोपखेल : ४, २) भोसरी, चक्रपाणी वसाहत : ६, ३) वैदूवस्ती, क्रांतीनगर, जवळकरनगर : २९.
अनुसूचित जातींचे प्रभाग
१) तळवडे चिखली परिसर : १, २) दिघी बोपखेल परिसर : ४, ३) जयगणेश साम्राज्य, गवळीमाथा भोसरी परिसर : ८, ४) मासूळकर कॉलनी, अजमेरा पिंपरी परिसर : ९, ५) संभाजीनगर, शाहूनगर परिसर : १०, ६) अजंठानगर, कृष्णानगर परिसर : १ १, ७) निगडी यमुनागनर परिसर : १३, ८) किवळे मामुर्डी, रावेत परिसर : १६, ९) उद्योगनगर, भाटनगर, आनंदनगर : १९, १०) संत तुकारामनगर, फुलेनगर, महेशनगर परिसर : २०, ११) पिंपरीगाव, अशोक थिएटर परिसर : २ १, १२) डांगे चौक, शिवतीर्थनगर, थेरगाव परिसर : २३, १३) गणेशनगर, पडवळनगर, बेलठिकानगर परिसर : २४, १४) पुनावळे, ताथवडे परिसर : २५, १५) पिंपळे निलख कस्पटेवस्ती परिसर : २६, १६) काळेवाडी, तापकीरनगर, रहाटणी परिसर : २७, १७) पिंपळे सौदागर, शिवार गार्डन परिसर : २८, १८) दापोडी, फुगेवाडी, कुंदननगर परिसर : ३०, १९) नवी सांगवी, कीर्तीनगर, विनायकनगर परिसर : ३१, २०) सांगवी गावठाण, ढोरेनगर, पिंपळे निलख दापोडी पुल परिसर : ३२.

Web Title: Bopkhel, Chakrapani, Vaidewastha Scheduled Tribes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.