अहंकार बाळगाल, तर सत्ता गमवाल; शत्रुघ्न सिन्हा यांचा मोदींना अप्रत्यक्ष इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 09:41 PM2018-04-24T21:41:36+5:302018-04-24T21:41:36+5:30

मोदी आणि शहांवर सिन्हा यांची अप्रत्यक्ष टीका

bjp mp shatrughan sinha slams pm narendra modi and amit shah without taking names | अहंकार बाळगाल, तर सत्ता गमवाल; शत्रुघ्न सिन्हा यांचा मोदींना अप्रत्यक्ष इशारा

अहंकार बाळगाल, तर सत्ता गमवाल; शत्रुघ्न सिन्हा यांचा मोदींना अप्रत्यक्ष इशारा

googlenewsNext

पुणे : भारतात वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी असं चित्र दिसत असल्याचं सांगत भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचं नाव न घेता त्यांनी ही टीका केली. बदल होणं गरजेचं आहे. अहंकार आणि गर्व बाळगाल तर उद्ध्वस्त व्हाल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका व्याख्यानात ते बोलत होते.

मी भारतीय जनता पक्षाआधी भारती जनतेचा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. जर चांगले लोक राजकारणात यायला तयार नसतील तर त्यांना वाईट प्रशासनाच्या राज्यात जगावं लागतं. त्यामुळेच मी राजकारणात आलो, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपने आधीच नोटबंदी करून लोकांना कडुनिंबाची चव चाखायला लावली आता तर त्यावर कारले चढवून जीएसटीसारख्या गुंतागुंतीच्या प्रणालीची भेट दिला उच्चार त्यांनी  केला.लोक पंतप्रधानांना भेटू शकत नसले तरी आम्हाला मात्र निवडणुकीची आश्वासने कुठे गेली असा प्रश्न विचारत असल्याचा अनुभव सांगितला.राज्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे काय झाले, इथे हमीभाव मिळत नाही तर अधिक दर तर लांब आहेत असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
 

Web Title: bjp mp shatrughan sinha slams pm narendra modi and amit shah without taking names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.