भाजपा नगरसेवक तुषार कामठेला अटक, बनावट कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढल्याचं प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 06:21 AM2017-11-17T06:21:39+5:302017-11-17T06:22:12+5:30

भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांना गुरुवारी सांगवी पोलिसांनी अटक केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सांगवी पोलिसांकडे ४ नोव्हेंबरला गुन्हा दाखल झाला़

BJP corporator Tushar Kamthe arrested, case of election contest based on fake documents | भाजपा नगरसेवक तुषार कामठेला अटक, बनावट कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढल्याचं प्रकरण

भाजपा नगरसेवक तुषार कामठेला अटक, बनावट कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढल्याचं प्रकरण

Next

पिंपरी : भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांना गुरुवारी सांगवी पोलिसांनी अटक केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सांगवी पोलिसांकडे ४ नोव्हेंबरला गुन्हा दाखल झाला़ त्यानंतर कामठे अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात होते़ मात्र सत्र न्यायालय व उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने अखेर कामठे यांना सांगवी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवस पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी तुषार कामठे स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाले. प्रभाग क्रमांक २६ मधील भाजपाचे नगरसेवक तुषार गजानन कामठे यांच्या विरुद्ध काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी २७ आॅक्टोबरला सांगवी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
साठे यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे की, पिंपळे निलख या प्रभागात इतर मागास प्रवर्गातून २६ (ब) या उमेदवारीसाठी सचिन साठे यांनी अर्ज भरला होता. त्याच जागेसाठी तुषार कामठे यांनीही अर्ज भरला. कामठे यांचे अकरावी उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र खोटे असून, त्यांनी नापास असतानाही बारावीत प्रवेशासाठी खोटे प्रमाणपत्र सादर केले. तेच प्रमाणपत्र निवडणुकीतही सादर केले होते. त्यास सचिन साठे यांनी आक्षेप घेतला आहे.

Web Title: BJP corporator Tushar Kamthe arrested, case of election contest based on fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.