भामा आसखेड प्रकल्पग्रस्त : धरणग्रस्तांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 02:24 AM2018-04-16T02:24:45+5:302018-04-16T02:24:45+5:30

भामा आसखेड धरणातून पाण्याचे आवर्तन का सोडले? हे विचारण्यासाठी गेलेल्या प्रकल्पग्रस्त १९ शेतकऱ्यांसह अनोळखी १०० जणांवर गेल्या शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. ‘गुन्हे मागे घ्या, नाही तर आम्हाला अटक करा,’ अशी जोरदार मागणी करीत धरणग्रस्त शेतकºयांनी चाकण पोलीस ठाण्यावर हल्लाबोल करीत ठिय्या आंदोलन केले.

Bima Askhed Project Affected: Damages stuck in police station | भामा आसखेड प्रकल्पग्रस्त : धरणग्रस्तांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

भामा आसखेड प्रकल्पग्रस्त : धरणग्रस्तांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

Next

आंबेठाण - भामा आसखेड धरणातून पाण्याचे आवर्तन का सोडले? हे विचारण्यासाठी गेलेल्या प्रकल्पग्रस्त १९ शेतकऱ्यांसह अनोळखी १०० जणांवर गेल्या शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. ‘गुन्हे मागे घ्या, नाही तर आम्हाला अटक करा,’ अशी जोरदार मागणी करीत धरणग्रस्त शेतकºयांनी चाकण पोलीस ठाण्यावर हल्लाबोल करीत ठिय्या आंदोलन केले.
यावेळी झालेल्या बैठकीत शेकडो धरणग्रस्त शेतकºयांसह भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास सांडभोर, अनिल राक्षे, काँगे्रसचे पंचायत समिती उपसभापती अमोल पवार, आरपीआय तालुका अध्यक्ष संतोष जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भामा आसखेडचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार: चाकण पोलिसांनी सात एप्रिलला १९ आंदोलकांसह अन्य जवळपास ८० ते १०० लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ‘आमच्यावर दाखल करण्यात आलेले हे खोटे गुन्हे आहेत, आम्ही आमच्या हक्काच्या जमिनीसाठी आणि पाण्यासाठी भांडत आहोत. ज्या अधिका-यांनी तक्रार दिली त्यांना आम्ही त्रास दिला नाही. ते आम्हाला ओळखतदेखील नाहीत. आजवर आम्ही प्रशासनाला वेठीस धरले नसून सहकार्य केले आहे. आम्ही केवळ उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून आंदोलन करीत आहोत. आम्ही आंदोलक लाभक्षेत्राच्या नागरिकांच्या विरोधात नाही. उद्या आम्हाला आणि तुम्हाला पाणी राहणार नाही,’ असे आंदोलकांच्या वतीने देविदास बांदल आणि सत्यवान नवले यांनी बोलताना सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून भामा आसखेड धरणग्रस्त शेतकरी आपल्या न्याय्य-हक्कासाठी लढा देत आहेत. आम्ही कायदेशीर मार्गाने आंदोलन करीत आहोत. आमचे पुनर्वसन व्हावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने आदेश जारी केला आहे. जमिनीच्या बदल्यात जमीन हवी आहे. याकरिता हे आंदोलन सुरू आहे. आजपर्यंत हे आंदोलन प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी आपल्या ताकदीवर उभे केले आहे. तालुक्यातील एकही राजकीय नेता आजपर्यंत या आंदोलनात सहभागी झाले नव्हते. परंतु, शेतकºयांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे धरणग्रस्त शेतकºयांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, अनिल राक्षे, धैर्यशील पानसरे, राहुल नायकवाडी, राम गोरे, रवींद्र गाढवे, अमोल पानमंद, मनोज खांडेभराड, कामरुद्दीन शेख, भाजपाचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील, चांगदेव शिवेकर, सरपंच दत्ता मांडेकर, काँग्रेसचे पंचायत समिती उपसभापती अमोल पवार, आरपीआयचे तालुका अध्यक्ष संतोष जाधव; तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते; मात्र शिवसेनेचे जबाबदार नेते या बैठकीकडे फिरकलेसुद्धा नाहीत. तसेच धरणग्रस्त शेतकरी सत्यवान नवले, देविदास बांदल, बळवंत डांगले, बन्सु होले, सखुबाई चांभारे, किसन नवले आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी आंदोलक आणि सर्वपक्षीय नेते यांच्याशी चर्चा केली आणि प्रशासनाची सहकार्याची भावना असून जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी सर्व मागण्या मान्य केल्या आहेत, असे सांगितले. फक्त आंदोलन सनदशीर मार्गाने करावे. कायदा हातात घेऊन नये, अशी विनंतीवजा सूचना त्यांनी केली. जबाबदार अधिकाºयाने दिलेली खोटी तक्रार पोलिसांनी संपूर्ण चौकशी करून रद्द करावी आणि शेतकºयांची पिळवणूक आणि बदनामी करणाºया अधिकाºयावर कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी चाकण पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केली.

मयत धरणग्रस्त शेतक-यावर गुन्हा दाखल

नामदेव बाळा बांदल यांचे ८ महिन्यांपूर्वी निधन झाले आहे; मात्र, भामा आसखेडचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाकण पोलिसांनी नामदेव बाळा बांदल या मयत धरणग्रस्त शेतक-यावर गुन्हा दाखल केला असल्याचे आज उपस्थित शेतक-यांनी सांगितले.

मृत धरणग्रस्त शेतक-यांवर गुन्हा

आसखेड: भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकºयांचा आपल्या हक्काच्या पुनर्वसनासाठी लढा सुरू असताना धरण कार्यालयात जबरदस्तीने घुसून भामा आसखेड धरणाचे शाखा अभियंता सह कर्मचाºयांना धमक्या देऊन आणि दमबाजी करून बळजबरीने धरणातून सोडलेले पाणी बंद करण्यास भाग पाडल्याप्रकरणी सुमारे १०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, यात आठ महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या एका प्रकल्पग्रस्त शेतकºयावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नामदेव बाळा बांदल असे मृत; तसेच गुन्हा दाखल झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकºयाचे नाव आहे. त्यांचे आठ महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. यावर पोलीस निरीक्षक मनोज यादव म्हणाले की, नामदेव बांदल हे मृत असल्याचे समजते; परंतू याला जबाबदार फिर्यादी आहे. आमच्याकडे आलेल्या नावांच्या तपासात या काही बाबी आढळून आल्या आहेत. गावात एकाच नावाचे दोन व्यक्तीपण
आहेत त्यातील योग्य व्यक्तींचा तपास सुरू आहे. धरणप्रशासनाचे सर्जेराव मेमाणे (फिर्यादी) यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Bima Askhed Project Affected: Damages stuck in police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.