1,400 किलो वजनाचा युवराज ठरला देशातील सवरेत्तम वळू

By admin | Published: October 19, 2014 02:24 AM2014-10-19T02:24:30+5:302014-10-19T02:24:30+5:30

हरियाणातून आणलेला तब्बल 1,4क्क् किलो वजनाचा ‘युवराज’ येथे झालेल्या दुभत्या जनावरांच्या अखिल भारतीय प्रदर्शन व स्पर्धेत देशातील अव्वल म्हणून निवडला गेला.

The best bull in the country, weighed 1,400 kg | 1,400 किलो वजनाचा युवराज ठरला देशातील सवरेत्तम वळू

1,400 किलो वजनाचा युवराज ठरला देशातील सवरेत्तम वळू

Next
मेरठ : हरियाणातून आणलेला तब्बल 1,4क्क् किलो वजनाचा ‘युवराज’ येथे झालेल्या दुभत्या जनावरांच्या अखिल भारतीय प्रदर्शन व स्पर्धेत देशातील अव्वल म्हणून निवडला गेला.
मुर्राह प्रजातीच्या युवराजची 1क् सदस्यांच्या निवड मंडळाने निवड केल्यानंतर बघ्यांनी हे एक नंबरी वाण बघण्यासाठी एकच गर्दी केली. पण त्याचा मालक करमवीर सिंग याने युवराजला आलेले सात कोटी रुपयांचे गि:हाईकही नाकारल्याचे कळल्यावर युवराजइतकाच त्याचा धनीही सर्वाचा कुतुहलाचा विषय ठरला.
 कुरुक्षेत्र येथील करमवीर सिंग यांनी सांगितले की, चंदिगडहून आलेल्या एका डेअरी फार्मवाल्याने   सात कोटींना युवराज खरेदी करण्याची तयारी दर्शविली हे खरे आहे. पण युवराजला मी माङया मुलासारखे वाढविले आहे. त्यामुळे काही झाले तरी मी त्याला विकणार नाही.
खरे तर माङया दृष्टीने पैसा हे आयुष्याचे सर्वस्व नाही. शिवाय युवराजच्या जिवावर मी वर्षाला 5क् लाख रुपये कमावतो. मग मी त्याला का बरे विकावे, असेही करमवीर सिंग यांनी विचारले.
युवराजचे सर्व काही थक्ककरणारे असेच आहे. तोंडापासून शेपटार्पयत त्याची लांबी चक्क 14 फूट आहे व खुरापासून वशिंडार्पयतची उंची 5 फूट 9 इंचाहूनही सूतभर जास्त आहे. 2क् लिटर दूध, पाच किलो सफरचंदे व उत्तम प्रतीचे 15 किलो पशुखाद्य हा त्याचा रोजचा आहार आहे. 
 युवराजचे मूल्य त्याच्या मालकाच्या दृष्टीने सोन्याने तुला करावी एवढे आहे.  त्याचे कारण स्पष्ट करताना सरदार वल्लभभाई पटेल कृषी विद्यापीठाचे वैज्ञानिक रवींदर संगवान यांनी सांगितले की, युवराजसारखा मुर्राह जातीचा नामवंत वळू दिवसाला 3.5 ते 5 मिलि वीर्याची निर्मिती करतो. 
कृत्रिम रेतनासाठी हे वीर्य पातळ करून वापरले जाते. म्हणजेच या वळूचे दररोज 35 मिली वीर्य मिळू शकते. एका कृत्रिम रेतनासाठी असलेला 1,5क्क् रुपयांचा दर विचारात घेतला तर युवराजपासून दररोज 2.1क् लाख रुपयांची कमाई होऊ शकते. (वृत्तसंस्था)
 

 

Web Title: The best bull in the country, weighed 1,400 kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.