सावधान! थुंकल्यास होणार दंड-शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 02:35 AM2018-11-13T02:35:08+5:302018-11-13T02:35:32+5:30

वानवडी व कल्याणीनगर : सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई

 Be careful! Spit will be punishment punishment | सावधान! थुंकल्यास होणार दंड-शिक्षा

सावधान! थुंकल्यास होणार दंड-शिक्षा

Next

वानवडी : स्वच्छ भारत अभियान सुरू असताना आता महापालिकेच्या वतीनेच प्रत्येक प्रभागामध्ये सहायक आयुक्त कार्यालयामार्फत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºयांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात येत आहे. प्रभाग क्र. २५ वानवडी परिसरात वानवडी-रामटेकडी सहा. आयुक्त कार्यालयातील आयुक्त संजय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर थुंकून घाण करणाºयांच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली.

आरोग्य विभागाकडून ही कारवाई वानवडी परिसरातील शिवरकर रोडवर असणाºया पानटपºया चहाची ठिकाणे, बसस्थानके, सांस्कृतिक भवन तसेच रस्त्यावरून वाहन चालवताना थुंकणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेंतर्गत ३० जणांवर कारवाई करण्यात आली यामध्ये १०० रुपये दंड आकारून पावती देण्यात येत होती. त्यातूनच रोख स्वरूपात जवळपास १००० रुपये दंडाची रक्कम गोळा करण्यात आली तसेच ज्यांच्याकडून दंड भरला गेला नाही, अशा व्यक्तींकडून रस्त्यावर थुंकलेले साफ करण्यात आले.
रस्त्यावर थुंकून घाण करणाºयांवर कारवाई सुरू ठेवणार असल्याचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दिलावर आवटी यांनी सांगितले. ही कारवाई आरोग्य निरीक्षक प्रदीपकुमार राऊत, इरफान मोमीन, राहुल
काकडे व सहकारी यांच्या पथकाने केली.

कारवाईचे स्वागत, पण सातत्य हवे
वानवडी परिसरात सोमवारी सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºया व्यक्तींवर महापालिका आरोग्य विभागातर्फे कारवाई करण्यात आली. ही कारवाई होत असताना काही व्यक्ती, महिला यांनी स्वागतही केले; परंतु एखादी मोहीम राबवली जाते आणि ती त्या काळापुरतीच ठरते. त्यामुळे असे न होता रोजच्या रोज वानवडी परिसरात अशी कारवाई होणे गरजेचे आहे.
जेणेकरून थुंकूण परिसर घाण करणाºया व्यक्तींवर वचक बसेल व परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाकडून अशी कारवाई होत असताना प्रथमत: ती सरकारी कार्यालये, दवाखाने, मनपा शाळा, दफ्तरे, सांस्कृतिक भवन अशा ठिकाणातील परिसरामध्ये थुंकणाºयांवर कारवाई व्हावी.

Web Title:  Be careful! Spit will be punishment punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.