मांजरी निवडणुकीत बोगस मतदान? राष्ट्रवादीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 03:42 AM2018-03-06T03:42:44+5:302018-03-06T03:42:44+5:30

मांजरी ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान ओळखपत्रे सापडली असून, निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले असताना, पोलिसांनी कारवाई टाळली असल्याचे निदर्शनास आले आहे. बोगस ओळखपत्र व त्यामागील सूत्रधारास अटक करावी...

 Bargas voting in cats elections? NCP's allegation | मांजरी निवडणुकीत बोगस मतदान? राष्ट्रवादीचा आरोप

मांजरी निवडणुकीत बोगस मतदान? राष्ट्रवादीचा आरोप

Next

हडपसर - मांजरी ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान ओळखपत्रे सापडली असून, निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले असताना, पोलिसांनी कारवाई टाळली असल्याचे निदर्शनास आले आहे. बोगस ओळखपत्र व त्यामागील सूत्रधारास अटक करावी; अन्यथा पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले यांनी दिला आहे.
हडपसर पोलीस स्टेशनमध्ये सुरेश घुले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांची भेट देऊन निवेदन दिले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, विशाल घुले, शिवाजी खलसे, प्रशांत घुले, दिलीप टकले आदी या वेळी उपस्थित होते. नुकतीच मांजरी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली, या निवडणुकीत वॉर्ड क्र.३ मध्ये ३०० बोगस मतदान ओळखपत्र व बाहेरून मतदानासाठी आलेले कार्यकर्ते सापडले. बोगस ओळखपत्र व कार्यकर्ते हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले. पण, आमदार योगेश टिळेकरांच्या दबावामुळे पोलिसांकडून अद्याप कारवाई करण्यात आली नाही, बोगस मतदान ही लोकशाहीला मारक असून प्रामाणिक कार्य करणाºया कार्यकर्त्यांवर अन्याय आहे. पोलिसांनी गांभीर्याने कारवाई केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या वतीने हडपसर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मांजरी निवडणूक पारदर्शक पद्धतीने झाली नाही, पोलीस, प्रशासन हाताशी धरून आमदारांनी अशाच पद्धतीने पूर्ण ग्रामपंचायत वॉर्डात बोगस मतदान केल्याचा संशय सुरेश घुले यांनी व्यक्त केला आहे. बोगस निवडणूक ओळखपत्रांबाबत निवडणूक आयोग व संबंधित कार्यालयाकडे आम्ही रिपोर्ट पाठविणार आहोत, असे मिलिंद पाटील यांनी सांगितले. विशाल ढोरे यांच्या तक्रारीत तपास करून कारवाई करणार असल्याचे विष्णू पवार यांनी सांगितले.

कोंढव्याप्रमाणे मांजरीत आमदाराचा डाव
मनपा निवडणुकीत आमदार योगेश टिळेकर यांनी आईच्या प्रभागात बाहेरून लोक आणून बोगस मतदान केले होते, तेव्हा गाड्या पकडल्या होत्या. मांजरी ग्रामपंचायत निवडणुकीतही बाहेरून बोगस मतदार आणले, बोगस मतदार ओळखपत्र सापडले आहेत लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम आमदाराने केले आहे, जनता २०१९ निवडणुकीत परतफेड करेल.
- सुरेश घुले, राष्ट्रवादी काँग्रेस
हल्लेखोरांवर
कारवाई करावी
निवडणुकीच्या आदल्या दिवशी माझ्या घरावर व कुटुंबावर हत्यारे घेऊन हल्ला केला, गाड्या फोडल्या, दगडफेक केली. पोलिसांनी अद्याप या गुंडांवर कारवाई केली नाही, हल्ला करणारे हल्लेखोर प्रमोद कोद्रे, प्रदीप कोद्रे, सराईत गुन्हेगार संतोष जायभाय, बबन जगताप व मुख्य सूत्रधारावर गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करू.
- विशाल ढोरे, मनसे

Web Title:  Bargas voting in cats elections? NCP's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.