बंधुभावातून नावारूपाला आली 'पार्क इन्फोनिया' महिला भजनी मंडळाद्वारे जपली जाते धार्मिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 06:25 AM2017-07-26T06:25:10+5:302017-07-26T06:25:10+5:30

bandhaubhaavaatauuna-naavaarauupaalaa-alai-paaraka-inaphaonaiyaa-mahailaa-bhajanai-mandalaadavaarae | बंधुभावातून नावारूपाला आली 'पार्क इन्फोनिया' महिला भजनी मंडळाद्वारे जपली जाते धार्मिकता

बंधुभावातून नावारूपाला आली 'पार्क इन्फोनिया' महिला भजनी मंडळाद्वारे जपली जाते धार्मिकता

Next

फुरसुंगी : पार्क इन्फोनिया ही फुरसुंगी परिसरात सर्वांत मोठी सोसायटी म्हणून ओळखली जाते. या सोसायटीत सुमारे १,१०० कुटुंबांत ३,५०० नागरिक आनंदाने राहतात. या सोसायटीत सांस्कृतिक कमिटीच्या माध्यमातून सर्व जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, नवरात्र, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, ख्रिसमस, होळी, छटपूजा असे अनेक धार्मिक सण साजरे केले जातात. या सणांमधून एकता व बंधुभाव निर्माण होतो. सासवड रस्त्याने फुरसुंगी कमानीपासून फुरसुंगीकडे जाणार्‍या रस्त्याच्या कडेला ही सोसायटी आहे. या सोसायटीला एकत्र आणणारे व मार्गदर्शन करणारे अध्यक्ष संजय कुदळे, संचालक राचय्या हिरेमठ, संपत शिंदे, दत्तात्रय घाडगे, मोहन टिळेकर, डॉ. सुवर्णा गायकवाड, योगेश कदम तसेच सोसायटीचे सर्व पदाधिकारी कार्यरत आहेत. या सोसायटीत ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला असून, सभासदांचे आई-वडील सतत हसत राहावेत म्हणून दररोज २०० लोक एकत्र येऊन हास्य योग करतात व आपल्या आरोग्याची काळजी घेतात. या सोसायटीत महिला भजनी मंडळाच्या माध्यमातून दररोज सांयकाळी भजनाचा कार्यक्रम करून धर्मिकता जपली जाते. या ससोसायटीतील सर्व नागरिक येथे होणार्‍या कार्यक्रमांत सहभागी होत असतात. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यात सर्व जण मिळूनमिसळून सहभागी होतात. प्रशस्त असणार्‍या या सोसायटीत क्बल हाऊस, पोहण्यासाठी तलाव आहे. तसेच, नागरिकांना दररोज सकाळ-सायंकाळी फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅक आहे. सर्व सोयीसुविधा असणार्‍या या सोसायटीमध्ये विविध कार्यक्रमांची कायम रेलचेल असते. त्यामुळे नागरिक एकमेकांशी एकोप्याने राहतात. ही सासयटी ४१ एकरांमध्ये आकाराला आली आहे. या सोसायटीत पर्यावरणाचे संवर्धन व जतन करण्यासाठी २५ एकरांची बाग असून तेथे सुमारे दीड हजार झाडे लावलेली आहेत. ०००

Web Title: bandhaubhaavaatauuna-naavaarauupaalaa-alai-paaraka-inaphaonaiyaa-mahailaa-bhajanai-mandalaadavaarae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.