Maharashtra HSC result 2018 : गुणांच्या स्पर्धेत मुंबईने टाकले सगळयांना मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 03:51 PM2018-05-30T15:51:49+5:302018-05-30T15:51:49+5:30

राज्यमंडळाने गेल्या काही वर्षांपासून राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे बंद केले आहे. मात्र ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागनिहाय संख्या मंडळाकडून जाहीर करण्यात आली

बारावीचा निकाल 2018 : Mumbai take over all in mark competition | Maharashtra HSC result 2018 : गुणांच्या स्पर्धेत मुंबईने टाकले सगळयांना मागे

Maharashtra HSC result 2018 : गुणांच्या स्पर्धेत मुंबईने टाकले सगळयांना मागे

Next
ठळक मुद्दे९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण : तब्बल ५ हजार ४८६ विद्यार्थ्यांची बाजी

पुणे : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेत राज्यभरातून ५ हजार ४८६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत, यामध्ये सर्वाधिक २ हजार २८८ विद्यार्थी एकटया मुंबई विभागाचे आहेत. त्यामुळे यंदा मुंबईच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळविण्यामध्ये सगळया विभागांना मागे टाकले आहे.  
राज्य मंडळाचा बारावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. राज्यमंडळाने गेल्या काही वर्षांपासून राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे बंद केले आहे. मात्र ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागनिहाय संख्या मंडळाकडून जाहीर करण्यात आली.
मुंबई विभागातून ३ लाख ११ हजार ६५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २ हजार २८८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. त्याचबरोबर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून ३८ हजार २१४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.  
पुणे विभागातून २ लाख ३५ हजार ५०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७०० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. ७५टक्क्यांपेक्षा जास्त गूण मिळालेले २० हजार ८७० विद्यार्थी आहेत.  
नागपूर विभागामधून १ लाख ६४ हजार ६२७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत बसले होते. यातील १ लाख ४४ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी ६९८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गूण मिळविणाऱ्यांचे प्रमाण १० हजार ३०२ इतके आहे.औरंगाबाद विभागामधून  १ लाख ५९ हजार ०८६ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. यापैकी २९४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले तर १६ हजार ०१६ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गूण मिळाले. 
कोल्हापूर विभागामधून १ लाख २५ हजार ६४८विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३५० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गूण मिळविणाऱ्यांचे प्रमाण ८ हजार ९०५ इतके आहे. अमरावती विभागामधून १ लाख ४४ हजार २३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५९९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले तर ७५ टक्क्यांपेक्षा १२ हजार ४०८ विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळाले. नाशिक विभागातील १५६ विद्यार्थ्यांना तर लातूर विभागातील २५९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. 
.............
५२ हजार विद्यार्थी ४५ टक्क्यांच्या आत
राज्यातील ५२ हजार ६६० विद्यार्थ्यांना ३५ ते ४५ टक्क्यांच्या दरम्यान मिळाले आहेत. ४५ ते ६० टकक्क्यांच्या दरम्यान ५ लाख ६७ हजार ८५३ विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहेत.

Web Title: बारावीचा निकाल 2018 : Mumbai take over all in mark competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.