पैसे आणि साड्या वाटण्याच्या अमिषाने महिलांचे मंगळसुत्र लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 08:45 PM2018-09-26T20:45:22+5:302018-09-26T20:52:00+5:30

गरीबांना पैसे व साड्यांचे वाटप करण्याच्या अमिषाने दोन महिलांचे मंगळसुत्र हातचलाखीने लंपास केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना कोथरुड व शिवाजीनगर येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास घडल्या.

attraction of saree and money to women's after mangalsutra | पैसे आणि साड्या वाटण्याच्या अमिषाने महिलांचे मंगळसुत्र लंपास 

पैसे आणि साड्या वाटण्याच्या अमिषाने महिलांचे मंगळसुत्र लंपास 

googlenewsNext
ठळक मुद्देदोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास ५२ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलिसांकडे दिली फिर्याद

पुणे : गरीबांना पैसे व साड्यांचे वाटप करण्याच्या अमिषाने दोन महिलांचे मंगळसुत्र हातचलाखीने लंपास केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना कोथरुड व शिवाजीनगर येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास घडल्या. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. 
याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात सुतारदरा येथे राहणाऱ्या ५२ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. त्या मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास कोथरुड येथील रामबाग कॉलनी परिसरात असताना त्यांच्याजवळ एक अनोळखी व्यक्ती आला. त्याला गोवा येथे २५ लाखाची लॉटरी लागलेली आहे. त्यामुळे गरीबांना वाटण्यासाठी त्याने पैसे व साड्या आणल्या असल्याचे अमिष दाखवले. त्यानंतर त्यांच्या पिशवीमध्ये पैसे टाकण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील २५ हजार रुपयांचे मंगळसुत्र हातचलाखीने काढून घेतले. 
दुसरी घटना शिवाजीनगर येथील भैयावाडी येथे मंगळवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली़. जया कसबे (वय ३९, रा़ शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे़.
त्या  शिवाजीनगर येथील भैय्यावाडी चाळ येथून दुपारी जात होत्या. त्यावेळी त्यांच्याकडे एक जण आला़. त्याने जया कसबे यांना थांबवून आम्ही गोर गरिबांना साड्या व पैसे दान करत आहोत, असे अमिष दाखवत त्याच्या खिशातून नोटांचे बंडल काढून ते त्यांना दाखवले. तसेच त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र काढून देण्यास सांगितले. ते मंगळसुत्र शंभर रुपयांच्या नोटांमध्ये गुंडाळण्याचा बहाणा करून त्यांच्याकडे दिले. तो पुढे गेल्यावर त्यांनी त्यांचे मंगळसुत्र पाहण्यासाठी नोटा काढल्या. तर त्यात दगड गुंडाळलेले होते. 

Web Title: attraction of saree and money to women's after mangalsutra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.