जिल्हाधिकारी कार्यालयात रॉकेल अंगावर ओतून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 03:50 PM2018-04-14T15:50:12+5:302018-04-14T15:50:12+5:30

सातबारावर आपले नाव लावावे, अशी त्यांची मागणी होती़ यासाठी शुक्रवारी सायंकाळी ते जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावर आले होते़.

attempt of suicide farmer by pouring kerosene on the body at Collector's office | जिल्हाधिकारी कार्यालयात रॉकेल अंगावर ओतून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

जिल्हाधिकारी कार्यालयात रॉकेल अंगावर ओतून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देकाही जमीन त्यांच्या चुलत्यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी परस्पर विकली असा त्यांचा आरोप

पुणे : सात बारा उताऱ्यावर आपले नाव लावावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़. परंतु, यावेळी तेथे उपस्थित असलेल्या इतरांनी त्यांना वाचविले़. 
याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी नागेंद्र गोपाळ वंजारी (वय ४७, रा़ फुलगाव, ता़ हवेली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी श्रीरंग बळे (वय ४७, रा़ कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत बंडगार्डन पोलिसांनी सांगितले की, नागेंद्र वंजारी यांची वडिलोपार्जित जमीन आहे़. सुमारे ७० वर्षांपूर्वी त्यांनी ती विकत घेतली होती़. त्यापैकी काही जमीन त्यांच्या चुलत्यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी परस्पर विकली असा त्यांचा आरोप आहे़. ही जमीन परत मिळवून देऊन त्याच्या सातबारावर आपले नाव लावावे, अशी त्यांची मागणी होती़. यासाठी शुक्रवारी सायंकाळी ते जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावर आले होते़.त्यांनी तेथील अधिकाऱ्यांनी तुम्ही न्यायालयात जाऊन यावर निकाल घ्यावा, असे सांगण्यात आले होते़. परंतु, कोठेच आपले म्हणणे ऐकून घेतले जात नाही, असे वाटून त्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्या स्वीय सहायक सतीश जाधव यांच्या कार्यालयात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या अंगावर रॉकेल ओतून घेत काडेपेटीने स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला़. पण, हा प्रकार तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या लक्षात येताच त्यांच्याकडील काडेपटी हिसकावून घेण्यात आली़. त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़. बंडगार्डन पोलीस ठाण्याचे हवालदार नवनाथ डांगे अधिक तपास करत आहेत़.

Web Title: attempt of suicide farmer by pouring kerosene on the body at Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.