सासवड येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाला १ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 03:23 PM2018-06-29T15:23:33+5:302018-06-29T15:27:31+5:30

दाखल गुन्ह्यात जामीन मंजूरीसाठी सहकार्य करणेसाठी लोकसेवक पालवे यांनी दीड लाखांची मागणी केली होती.

Assistant Police Inspector caught while taking a bribe of 1 lakh at Saswad | सासवड येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाला १ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले 

सासवड येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाला १ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले 

googlenewsNext

सासवड : सासवड येथील कोर्टात संदिप बाळकृष्ण होले यांच्यावर गुन्ह्यातील दाखल प्रकरणात आरोपीला जामीन मिळविण्यासाठी मदत करण्याच्या कामी एक लाखांची लाच स्विकारताना सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद काशिनाथ पालवे (४२) व एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी श्रीकांत बाळासो ताम्हाणे (वय २९) यांना लाच घेताना सासवडजवळील एखतपूर येथे गुरुवारी  दि. २८ जून) रात्री ११ च्या सुमारास लाचलुचपत विभागाचे वतीने रंगेहाथ पकडण्यात आले. संदिप बाळकृष्ण होले यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूरीसाठी सहकार्य करणेसाठी लोकसेवक पालवे यांनी दीड लाखांची मागणी केली. त्यातील एक लाख रुपये श्रीकांत ताम्हाणे याने घेत व त्यांनी पदाचा गैरवापर केला व गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केले. म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे फिर्यादी प्रतिभा प्रल्हाद शेंडगे पोलीस उपअधिक्षक लाचलुचपत पुणे यांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहेत.

Web Title: Assistant Police Inspector caught while taking a bribe of 1 lakh at Saswad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.