Pune: नुकतीच दहावीची परिक्षा दिलेल्या आर्यावर काळाचा घाला, केडगाव येथे रेल्वे अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 12:09 PM2024-04-23T12:09:33+5:302024-04-23T12:15:21+5:30

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली...

Arya, who recently passed the 10th exam, died in a train accident at Kedgaon | Pune: नुकतीच दहावीची परिक्षा दिलेल्या आर्यावर काळाचा घाला, केडगाव येथे रेल्वे अपघातात मृत्यू

Pune: नुकतीच दहावीची परिक्षा दिलेल्या आर्यावर काळाचा घाला, केडगाव येथे रेल्वे अपघातात मृत्यू

केडगाव (पुणे) : केडगाव रेल्वे स्टेशननजिक जगताप वस्ती पाठीमागे आयुष पार्क जवळ काल सायंकाळी आर्या संभाजी गायकवाड या मुलीचा साडेसातच्या दरम्यान रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. जगतापवस्ती केडगाव स्टेशन, ता. दौंड येथे राहणाऱ्या आर्याने नुकतीच जवाहरलाल इंग्लिश मीडियम स्कूल केडगाव येथुन दहावीची परीक्षा दिली होती.  

दि. २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास रेल्वेची धडक बसली. या धडकेत आर्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

केडगाव पोलीस चौकीच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदणासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला होता. शवविच्छेदन झाल्यानंतर तीचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर रात्री उशीरा तिचा अंत्यविधी करण्यात आला. या घटनेने केडगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Arya, who recently passed the 10th exam, died in a train accident at Kedgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.