अल्पसंख्याक शाळांमध्ये ५० टक्के पदे भरण्यास परवानगी : दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 10:00 AM2023-07-15T10:00:18+5:302023-07-15T10:01:15+5:30

अल्पसंख्याक संस्था, शाळा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करणार असल्याचे सांगून केसरकर म्हणाले...

Allowed to fill 50 percent posts in minority schools: Deepak Kesarkar | अल्पसंख्याक शाळांमध्ये ५० टक्के पदे भरण्यास परवानगी : दीपक केसरकर

अल्पसंख्याक शाळांमध्ये ५० टक्के पदे भरण्यास परवानगी : दीपक केसरकर

googlenewsNext

पुणे : अल्पसंख्याक शाळाम्ध्ये ५० टक्के पदे भरण्यास परवानगी देण्यात आली असून, त्यांनी भरती प्रक्रिया राबवावी. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत ८ वीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. बहुसंख्य अल्पसंख्याक मुली आठवीनंतर शाळा सोडतात. त्यामुळे अशा शाळांमध्ये नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्रीदीपक केसरकर यांनी सांगितले.

अल्पसंख्याक संस्था, शाळा आणि विद्यार्थी यांच्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका व राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमार्फत गुणवत्ता वाढीसाठी तयार केलेल्या निवडक विशेष उपक्रम पुस्तिकेच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, शिक्षण संचालक (योजना) डॉ. महेश पालकर आदी उपस्थित होते.

अल्पसंख्याक संस्था, शाळा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करणार असल्याचे सांगून केसरकर म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येईल. मातृभाषेतून शिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान मिळेल. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम करणे आवश्यक आहे. शासनातर्फे विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पुस्तके अन्य सोयीसुविधा पुरविण्यात येत आहेत.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येत आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी. शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शिक्षण प्रणाली अवलंबिण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मांढरे म्हणाले, अल्पसंख्याक संस्था, शाळा व विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने विविध योजना सुरू केल्या आहेत. शालेय शिक्षण घेणाऱ्यांसाठी संबंधित योजनांची माहिती संकलित करणे आवश्यक होते. क्षेत्रीय स्तरावर अल्पसंख्याक विद्यार्थी व अल्पसंख्याक संस्था संचलित शाळा यांच्याबाबत प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांवर मुदतीत कार्यवाही होण्याच्या दृष्टीने कार्यपद्धतीविषयी संदिग्धता राहू नये यासाठी सर्व कायदेशीर तरतुदी, महत्त्वाचे शासननिर्णय, शासन परिपत्रके व न्यायालयीन आदेश यावर आधारित व गुणवत्ता वाढीसाठी निवडक विशेष उपक्रमावर पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. याचा अल्पसंख्याक विद्यार्थी, संस्था यांना लाभ होईल.

यावेळी केसरकर यांच्या हस्ते प्रशासन व अल्पसंख्याक संस्था, शाळा आणि विद्यार्थी यांच्यासाठीची मार्गदर्शक पुस्तिका व राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमार्फत गुणवत्ता वाढीसाठी निवडक विशेष उपक्रम पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले आणि पुस्तिका निर्मिती करण्यामध्ये योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Allowed to fill 50 percent posts in minority schools: Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.