Pune: शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत पोटातील अर्भक दगावल्याचा आरोप, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 11:41 AM2024-04-06T11:41:07+5:302024-04-06T11:41:31+5:30

या मारहाणीत महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला असून समर्थ पोलिसांनी एकाला अटक केली आहे...

Allegation of death of unborn baby due to beating by neighbor, case registered | Pune: शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत पोटातील अर्भक दगावल्याचा आरोप, गुन्हा दाखल

Pune: शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत पोटातील अर्भक दगावल्याचा आरोप, गुन्हा दाखल

पुणे : घराच्या दरवाजाला लाथ मारल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीसह गरोदर महिलेला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला असून समर्थ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नवाज खान (२७, रा. यार खान कॉम्प्लेक्स, मंगळवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर रफिया खान, नासिर खान आणि सलमान उर्फ टिपू शेख (सर्व रा. मंगळवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका २५ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाज खान याने फिर्यादी यांच्या घराच्या दारावर लाथ मारली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी हे पत्नी आणि त्यांचा मानलेला भाऊ नवाज खानच्या घरी गेले होते. त्यावेळी नवाज खान त्याची आई रफिया खान, नासिर खान यांनी शिवीगाळ करत मारहाण केली होती. फिर्यादीची पत्नी या गरोदर असल्याचे नवाज आणि इतरांना माहिती होते. तरी देखील तिच्या पोटावर मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

त्यानंतर नवाज खान याने फिर्यादीच्या दुचाकी गाडीवर दगड मारून तिचे नुकसान केले. तर, सलमान उर्फ टिपू शेख याने फिर्यादी यांना फोन करून पोलिसांकडे तक्रार दाखल केलीस तर तुला ठार मारीन अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोटाला मार बसल्याने पोटातील अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) नीलेश बडाख करत आहेत.

Web Title: Allegation of death of unborn baby due to beating by neighbor, case registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.