अलार्म वाजला अन पेट्रोलियम कंपनीतील तेल चोरीचा डाव फसला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 07:13 PM2018-08-13T19:13:44+5:302018-08-13T19:19:59+5:30

पाईपलाईनच्या या संरक्षित क्षेत्रात कोणी खोदकामाचा प्रयत्न केला तरी लोणी टर्मिनलच्या कार्यालयातील सिग्नलचा अलार्म रविवारी मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी अचानक वाजू लागला़. त्याबरोबर पेट्रोलिंगची टीम सतर्क झाली.

Alarm is unfortunetly started and petroleum stolen caught..! | अलार्म वाजला अन पेट्रोलियम कंपनीतील तेल चोरीचा डाव फसला...!

अलार्म वाजला अन पेट्रोलियम कंपनीतील तेल चोरीचा डाव फसला...!

Next
ठळक मुद्देतेलाच्या पाईपलाईनचे नुकसान करुन पाईपलाईन मधून तेल चोरण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

पुणे : लोणी टर्मिनल येथील कार्यालयात मध्यरात्री पाऊण वाजता पाईपलाईनवरील सिग्नलचा अचानक अलार्म वाजू लागला़. त्याबरोबर पेट्रोलिंगची टीम सतर्क झाली. त्यांनी तातडीने पाईपलाईनची तपासणी सुरु केली. तेव्हा दिघीतील वडमुखवाडी येथील हॉटेल सर्जा मागे पाईपलाईनजवळ तीन ते चार जण खोदकाम करीत असल्याचे दिसून आले़ कामगारांना पाहून ते पळून गेले़. 
याप्रकरणी एचपीसीएल लोणी टर्मिनलचे परिचालन अधिकारी ब्रिजेश मिना यांनी दिघी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे पेट्रोल, डिझेल व केरोसिनची पाईपलाईन मुंबई, पुणे मार्गे सोलापूर येथे गेलेली आहे़. ही पाईपलाईन लोखंडी १४ इंची असून ती जमिनीखाली ५ ते ६ फुल खोल टाकलेली आहे़. पाईपलाईनच्या दोन्ही बाजूला १५ फुट व ४५ फुट अशी ६० फुट जागा आरक्षित केली आहे़ .त्याठिकाणी शेती कामाशिवाय अन्य खोद कामाला बंदी घालण्यात आली आहे़. या पाईपलाईन सोबत ओएफसी कम्युनिकेशन केबल टाकलेली आहे़. पाईपलाईनच्या या संरक्षित क्षेत्रात कोणी खोदकामाचा प्रयत्न केला तरी लोणी टर्मिनलच्या कार्यालयातील सिग्नलचा अलार्म वाजतो़. रविवारी मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी हा अलार्म अचानक वाजू लागला़ .तेव्हा कंपनीच्या पेट्रोलिंग टीमने ताजणेमळा ते जाधववाडी दरम्यान तपासणी केली. तेव्हा वडमुखवाडी येथे काही जण खोदकाम करीत असल्याचे दिसून आले़. कामगारांना पळून ते पळून गेले़ तेथे पाहणी केल्यावर पाईपलाईनपासून ३ फुटावर त्यांनी दोन फुट लांब, दोन फुट रुंद आणि दोन फुट खोल खड्डा खणला होता़. तेथे एक खोरे, प्लॅस्टिकचे घमेले, टिकाव, दोन सिमेंटच्या गोण्या आढळून आल्या़. कंपनीच्या तेलाच्या पाईपलाईनचे नुकसान करुन खड्डा खोदून पाईपलाईन मधून तेल चोरण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. सहायक पोलीस निरीक्षक आऱ एम़ गिरी तपास करीत आहेत़. 

Web Title: Alarm is unfortunetly started and petroleum stolen caught..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.