पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर अजित पवार लगेच सत्तेत गेले- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 01:16 PM2023-08-19T13:16:29+5:302023-08-19T13:35:23+5:30

पत्रकारांच्या पुरस्कार सोहळ्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मत मांडले...

Ajit Pawar immediately came to power after the Prime Minister accused him of corruption - Raj Thackeray | पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर अजित पवार लगेच सत्तेत गेले- राज ठाकरे

पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर अजित पवार लगेच सत्तेत गेले- राज ठाकरे

googlenewsNext

पिंपरी : मी अनेक वर्ष पत्रकारितेत काम केले आहे. महाराष्ट्रात अजून पत्रकारिता जिवंत आहे. राज्यातील पत्रकारांवरील हल्ले थांबले पाहिजेत. पत्रकारांनी ट्रोल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. ट्रोल करण्यासाठी अनेक पक्षांनी लोकं पाळली आहेत. सध्या राज्याच्या हिताचं बोलणे, वाचणे आवश्यक आहे, असं पत्रकारांच्या पुरस्कार सोहळ्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मत मांडले.

गेल्या दोन दिवसांपासून राज ठाकरेपुणे दौऱ्यावर आहेत. आज ते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, पत्रकारांनी प्रश्न विचारताना काळजी घेतले पाहिजी. कोणते प्रश्न विचारले पाहिजे याचा विचार केला पाहिजे. दुसरीकडे राज्यातील राजकारणाची भाषा सध्या बदलत आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही जन्माला येत नाही. आलेली सत्ता जाते हे राजकारण्यांनी समजून घेतले पाहिजे.

भ्रष्टाचाराचे आरोप, अजित पवार सत्तेत

यावेळी ठाकरे म्हणाले, जर एखादा हल्ला आमच्यावर झाला तर त्याचा राग आम्हालाही येतो. त्यामुळे हल्ले कुणावरही होऊ नयेत. दुसरीकडे अजित पवार सत्तेमध्ये गेले, त्याचा तुम्हाला राग आला पाहिजे. ज्या व्यक्तीवर पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले तोच व्यक्ती सत्तेत जातो. तो व्यक्ती सडेतोड खोटं बोलतो, त्याला जर लोक हसत असतील त्यांची प्रचंड चीड येते. पत्रकारांवर जर हल्ले झाले तर राज ठाकरे तुमच्यासोबत कायम असेल. असंही ते म्हणाले.

पिंपरी चिंचवड दौरा-

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्याचवेळी पिंपरी-चिंचवडमधील मनसैनिकांनी एकत्र येत मनसेची शाखा शहरात सुरू केली. आता दीड दशकानंतर या पक्षाला संघटनात्मक बांधणीबरोबर पक्ष नेतृत्वाच्या पाठबळाची असलेली गरज आजही आहे. शनिवारी (दि. १८) मनसे अध्यक्ष राज ठाकरे पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे शिवतीर्थमधून हे बळ मिळणार काय? याची प्रतीक्षा मनसैनिकाला आहे.

पिंपरी चिंचवडकडे दुर्लक्ष-

मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या ठिकाणीच ताकद वाढविण्यासाठी भर दिला. त्या तुलनेत त्यांचे काहीसे दुर्लक्ष झाले. तरीही त्यांना आणि त्यांच्या विचारांना मानणारा मनसैनिक आजही लढताना दिसत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, दोन्ही शिवसेना (ठाकरे, शिंदे) यांच्या स्पर्धेत आणि तुलनेत शहरात मनसेची ताकद फारशी नाही. मात्र, मनसैनिकांनी जपलेला कट्टरपणा, पक्षाच्या अस्तित्वासाठी सुरू ठेवलेली धडपड उल्लेखनीय आहे. त्यातून त्यांचे राज ठाकरेंवरील प्रेमही दिसते. या मनसैनिकाला ठाकरे यांनी राजकीय ताकद दिली असती, विविध प्रश्नांवर मनसेची म्हणून जर भूमिका घेतली असती, तर पक्षवाढीला बळ मिळाले असते; पण त्याकडे ठाकरे यांचे दुर्लक्ष झाल्याने मनसेचा अवकाश मर्यादित राहिला.

कार्यकर्त्यांना हवाय बूस्टर...

गेल्या सोळा वर्षात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता मनसेने निवडणुकीत सहभाग घेतला नाही. त्याचा फटका पक्षवाढीवर आणि संघटनात्मक ताकदवाढीवर झाला. निवडणूक कार्यकर्त्यांसाठी बूस्टर असतो; पण ती न लढल्याने मनसेची ताकद मर्यादित राहिली. तरीही जनहिताचे लहान-मोठे प्रश्न घेऊन मनसैनिक व्यवस्थेला जाब विचारत आहेत. त्यांच्या आंदोलनातून राजकीय ताकद निर्माण झालेली नाही, हे वास्तव आहे.

Web Title: Ajit Pawar immediately came to power after the Prime Minister accused him of corruption - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.