वृद्धत्व नव्हे कार्यातील उत्साह महत्वाचा : डॉ.रघुनाथ माशेलकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 04:49 PM2018-10-08T16:49:39+5:302018-10-08T17:01:24+5:30

वृध्दत्व आल्यानंतर आरोग्यविषयक तक्रारी जाणवू लागतात. मात्र, आपल्या कार्यातील उत्साह जपल्यास त्या वेदनांवर मात करणे शक्य होते.

Aging is not important, enthusiasm in the work is important: Dr. Raghunath Mashelkar | वृद्धत्व नव्हे कार्यातील उत्साह महत्वाचा : डॉ.रघुनाथ माशेलकर 

वृद्धत्व नव्हे कार्यातील उत्साह महत्वाचा : डॉ.रघुनाथ माशेलकर 

Next
ठळक मुद्दे ज्येष्ठांच्या भव्य आनंद मेळाव्याचे उद्घाटन एक लाख रुपयांचा आरोग्य विमा ज्येष्ठ नागरिकांचा असून त्याचा लाभ घेता येणार६० रुग्णालयांमध्ये रक्ताच्या सर्व प्रकारच्या चाचण्या ज्येष्ठ नागरिकांना मोफतवृध्दांकरिता वेगवेगळे उपक्रम व्हावेत यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील

पुणे :  तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होत असताना त्यामुळे होणारे बदल अवाक करणारे आहेत. आरोग्याच्या क्षेत्रात देखील त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होताना पाहावयास मिळतो. वृध्दत्व आल्यानंतर आरोग्यविषयक तक्रारी जाणवू लागतात. मात्र, आपल्या कार्यातील उत्साह जपल्यास त्या वेदनांवर मात करणे शक्य होते. त्यामुळे वृध्द झाले तरी उत्साह महत्वाचा असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. 
जनसेवा फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग, महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अस्कॉप याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांकरिता काम करणा-या इतर विविध संघटनांच्यावतीने ज्येष्ठांच्या आनंद मेळाव्यांचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या सोहळयाला डॉ.के.एच.संचेती, आमदार मोहन जोशी, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ.सिध्दार्थ धेंडे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, अंकुश काकडे, माजी मंत्री मदन बाफना, ज्येष्ठ उद्योजक बहारी बी.आर.मल्होत्रा, जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विनोद शहा आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सामाजिक व दानशुर कार्यकर्ते नानजीभाई शहा यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. वयाची शंभरी ओलांडलेल्या गऊबाई भिकोबा निवंगुणे (वय  १०८), इंदुबाई कृष्णा नलावडे (वय १०५), लक्ष्मण गणेश दिनकर (वय १०६), शालिनी चिरपुटकर (वय  १०२), विमलानंद पंडित (वय १०० ), अ‍ॅड. बी. जे. खताळपाटील (वय १०० ), नलिनी कुलकर्णी (वय १०० ),  मथुरा रघुनाथ फरगडे (वय १०० ) या ज्येष्ठांना शतायुषी पुरस्काराबरोबरच ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे, शरदचंद्र पाटणक र, वसंत थिटे दांम्पत्य यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  
डॉ. माशेलकर म्हणाले, आपल्याकडील शिक्षण ज्ञानवर्धित स्वरुपाचे आहे. त्याला भविष्यात मुल्यवर्धित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. मुल्यवर्धित शिक्षणाची बीजे मुलांमध्ये रुजल्यास त्यांची वृध्दांप्रती आदर व सन्मानाची भावना वाढण्यास मदत होईल. वृध्दत्व आनंदमयी करण्याकरिता उत्साह टिकवणे गरजेचे आहे. हे सांगताना माशेलकर यांनी स्वत: ७५ वर्षाचा असून देखील सतत कार्यरत असल्याचे उदाहरण दिले. अखंड उर्जा व इच्छाशक्ती असल्यास चिरंजीवी आयुष्य जगता येईल. असेही ते म्हणाले. 
उपमहापौर धेंडे यांनी ज्येष्ठ नागरिकांकरिता आरोग्याच्या विविध योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, एक लाख रुपयांचा आरोग्य विमा ज्येष्ठ नागरिकांचा असून खासगी रुग्णालयात देखील त्याचा त्यांना लाभ घेता येणार आहे. तसेच शहरातील वेगवेगळ्या ६० रुग्णालयांमध्ये रक्ताच्या सर्व प्रकारच्या चाचण्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत करता येणार आहेत.  मानपत्राचे वाचन शर्वरी शुक्ला सुत्रसंचालन विवेक कुलकर्णी यांनी केले. मीना शहा यांनी आभार मानले. 

* वृध्दमैत्री शहर व्हावे यासाठी राहणार प्रयत्नशील
आनंदी ज्येष्ठात्वाकरिता पुढील काळात शहरात वृध्दमैत्री शहर ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. तसेच वृध्दांकरिता वेगवेगळे उपक्रम व्हावेत यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील राहणार आहे. बसमध्ये, स्वच्छतागृहांमध्ये वृध्दांकरिता विशेष व्यवस्था करुन देणार असून नाना नानी पार्कच्या माध्यमातून त्यांना विरंगुळा केंद्राची निर्मिती केली जाईल. असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. 

Web Title: Aging is not important, enthusiasm in the work is important: Dr. Raghunath Mashelkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.