मांजामुळे कापला वकीलाचा गळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 07:04 PM2018-12-01T19:04:06+5:302018-12-01T19:06:16+5:30

पतंगासाठी वापरण्यात येणा-या नायलॉनच्या मांजाने दुचाकीवरून घरी निघालेल्या वकिलाचा गळा कापल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी १ वाजता वडगावशेरी येथे घडली.

advocates throat cut by manja | मांजामुळे कापला वकीलाचा गळा

मांजामुळे कापला वकीलाचा गळा

पुणे : पतंगासाठी वापरण्यात येणा-या नायलॉनच्या मांजाने दुचाकीवरून घरी निघालेल्या वकिलाचा गळा कापल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी १ वाजता वडगावशेरी येथे घडली. 

               या दुर्घटनेत अ‍ॅड. महेश गोगावले आणि त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. मांज्यामुळे शहरात यापुर्वी देखील दुर्घटना घडल्या आहेत. तरीही या मांज्याची विक्री आणि त्याचा वापर करणा-यांवर पोलीस व महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते. अ‍ॅड. गोगावले हे त्यांचा ८ वर्षांचा मुलगा ऋवेद याला घेवून दुचाकीवरून फिनिक्स मॉलमार्गे वडगावशेरी येथे असलेल्या त्यांच्या घरी जात होते. ते सोमनाथनगर येथील रामचंद्र सभागृह येथे आले असता ही घटना घडली. मांजामुळे गळा कापल्याने अ‍ॅड. गोगावले दुचाकीवरून पडले. त्यात त्यांच्या मुलाला हात आणि पायाला जखमा झाल्या. गळा कापल्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्तश्राव झाला होता. त्यामुळे अ‍ॅड. गोगावले यांनी अपघातानंतर त्वरीत स्वत:ला सावरत जवळचे रुग्णालय गाठले. सध्या त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. पतंगासाठी वापरण्यात येणारा मांजा अनेकांच्या जीवावर बेतल्यानंतर चायनीज, नायलॉनच्या मांज्याच्या वापरावर राष्ट्रीय हरीत प्राधिकरणाने (एनजीटी) जुलै २०१७ साली बंदी घातली आहे. मात्र त्याचा शहरात सर्रासपणे वापर सुरू आहे. 

       मांज्यामुळे आत्तापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. बंदी असतानाही रर्सार त्याची विक्री होताना दिसते. त्यामुळे या मांजाची विक्री करणा-यांवर सरकारने कडक कारवाई करावी. तसेच त्याचे उत्पादन व विक्री त्वरीत थांबवावी असे अ‍ॅड. गोगावले यांनी सांगितले. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. 

दोघांनी गमवला जीव 
माज्यांमुळे ८ आॅक्टोंबर रोजी एका महिलेला डॉक्टरला जीव गमवावा लागला. रुपाली निकम असे या महिला डॉक्टरचे नाव आहे. नाशिक फाट्याजवळ ही घटना घडली होती. त्याआधी एका महिला पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. काही वर्षांपुर्वी येरवडा परिसरात एक मांज्यामुळे मुलगा जखमी झाला होता. त्याचे दोन्ही गाल, कानाला कापले होते. तसेच, कोंढवा परिसरातही एक मुलगा जखमी झाला होता. एसपी कॉलेजच्या महाविद्यालयातील एका झाडावर मांज्यामध्ये घार अडकली होती. तिची सुटका अग्निशामक दलाकडून करण्यात आली होती.

Web Title: advocates throat cut by manja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.