वकिलांचे 31 मार्चला काम बंद आंदोलन

By admin | Published: March 28, 2017 02:47 PM2017-03-28T14:47:19+5:302017-03-28T14:47:19+5:30

केंद्र सरकार अ‍ॅडव्होकट अ‍ॅक्टमध्ये करीत असलेल्या सुधारणांना विरोध दर्शवण्यासाठी बार कौन्सिल ऑफ इंडियाने 31 मार्च रोजी वकिलांना काम बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

The advocates closed the movement on 31st March | वकिलांचे 31 मार्चला काम बंद आंदोलन

वकिलांचे 31 मार्चला काम बंद आंदोलन

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 28 - केंद्र सरकार अ‍ॅडव्होकट अ‍ॅक्टमध्ये करीत असलेल्या सुधारणांना विरोध दर्शवण्यासाठी बार कौन्सिल ऑफ इंडियाने 31 मार्च रोजी वकिलांना काम बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. 
 
केंद्रीय विधी आयोगाने अ‍ॅडव्होकट अ‍ॅक्ट १९६१मध्ये दुरुस्ती सुचवली आहे. ही दुरुस्ती लोकशाहीविरोधी आणि वकिलांच्या विरोधात असल्याचा दावा करुन बार कौन्सिल ऑफ इंडियाने त्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या आदेशानुसार बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा आणि बार असोशिएशनने ३१ मार्च रोजी वकिलांनी न्यायालयीन कामकाजात सहभागी होऊ नये, असे सांगून नव्या दुरुस्तीविरोधात आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.
 

Web Title: The advocates closed the movement on 31st March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.