पुणे-सोलापूर हायवेवर अपघात; 11 जण जखमी, चौघांची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 09:12 AM2018-02-20T09:12:18+5:302018-02-20T09:12:51+5:30

 पुणे-सोलापूर महामार्गावर उरुली कांचन येथे भीषण अपघात झाला आहे.

Accident on Pune-Solapur Highway; 11 injured, four are in serious condition | पुणे-सोलापूर हायवेवर अपघात; 11 जण जखमी, चौघांची प्रकृती गंभीर

पुणे-सोलापूर हायवेवर अपघात; 11 जण जखमी, चौघांची प्रकृती गंभीर

googlenewsNext

उरूली कांचन-  पुणे-सोलापूर महामार्गावर उरुली कांचन येथे भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रकनी एकमेकांना जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. उरुली कांचन हद्दीतील खेडेकर मळा येथे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास वाळुची वाहतुक करणारा ट्रक व टायरची वाहतुक करणारा ट्रक यांच्यात धडक झाली. या अपघातात अकरा जण जखमी झाले आहेत.  जखमी पैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे.  जखमी पैकी कांही जण इंदापूर परिसरातील तर काही उमरगा परिसरातील आहेत.  

जखमी मुंबईहून टायरची वाहतुक करणाऱ्या ट्रकमधून प्रवास करत होते. दरम्यान, जखमीना लोणी काळभोर येथील विश्वराज  रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
 

Web Title: Accident on Pune-Solapur Highway; 11 injured, four are in serious condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.