नगर-कल्याण महामार्गावर सहलीच्या बसला अपघात; तीन जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 11:02 PM2019-01-17T23:02:42+5:302019-01-17T23:42:14+5:30

पिकअप ट्रक आणि अहमदनगर येथील विद्यालयाच्या शैक्षणिक सहल घेऊन चाललेल्या बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.

Accident on the ahmadnagar-Kalyan highway; Three people killed | नगर-कल्याण महामार्गावर सहलीच्या बसला अपघात; तीन जण ठार

नगर-कल्याण महामार्गावर सहलीच्या बसला अपघात; तीन जण ठार

Next

पिंपरी पेंढार : नगर-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर गायमुखवाडी (पिंपरी पेंढार, ता. जुन्नर)  येथे कांद्याने भरलेला पिकअप ट्रक आणि अहमदनगर येथील विद्यालयाच्या शैक्षणिक सहल घेऊन चाललेल्या बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून,  शिक्षकांसह सुमारे ३० विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की पिकअप पूर्ण बसखाली गेली होती. तसेच दोन्ही वाहनांनी पेट घेतला होता. मृतांची नावे समजू शकली नाहीत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर येथील सावेडी येथील डॉन बॉक्सो विद्यालयाचे नववी, दहावी, अकरावी व बारावीचे विद्यार्थी शैक्षणिक सहलीला खासगी ट्रॅव्हलद्वारे नगर-कल्याण मार्गाद्वारे जात होते. ही बस पिंपरी पेंढार येथील गायमुखवाडी येथे आली असता समोरून कांद्याने भरून येणारा भरधाव पिकअप या बसला येऊन धडकला. या भीषण अपघातात बसमधील  तिघे जण मृत्युमुखी पडले, तर ३० विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळाली.

 





जेसीबीच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. ओतूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी  घटनास्थळी तातडीने हजर झाले. अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांनी पेट घेतला होता. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. जखमींना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: Accident on the ahmadnagar-Kalyan highway; Three people killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात