रक्षाबंधनासाठी माहेरी निघलेल्या विवाहितेचा तोंडावर दिले सिगारेट, इस्त्रीचे चटके

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 02:57 PM2023-09-03T14:57:35+5:302023-09-03T14:58:02+5:30

तुझ्या माहेरची तुझ्या हिश्श्याची जमीन माझ्या नावावर करून देत नाही. तोवर तुला घरात घेणार नाही, पतीकडून छळ

A married woman who left home for Rakshabandhan was given cigarettes iron strokes on her face | रक्षाबंधनासाठी माहेरी निघलेल्या विवाहितेचा तोंडावर दिले सिगारेट, इस्त्रीचे चटके

रक्षाबंधनासाठी माहेरी निघलेल्या विवाहितेचा तोंडावर दिले सिगारेट, इस्त्रीचे चटके

googlenewsNext

मंचर : माहेरची तुझ्या हिश्श्याची जमीन नावावर करून दे अशी मागणी करीत विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. तोंडावर सिगारेटने व हातावर इस्त्रीने चटके दिले गेले. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती शंकर महादेव लबडे (रा. निरगुडसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. छळाची ही घटना निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे राहते घरात घडली आहे.

पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात साक्षी शंकर लबडे यांनी पारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निरगुडसर येथे घरी असताना विवाहिता साक्षी हिने पती शंकर लबडे यांना रक्षाबंधन सण असल्याने माहेरी धोतरे (जि. अहमदनगर) येथे जायचे आहे असे सांगितले. पती शंकर लबडे याने चिडून जाऊन शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. तुला माहेरी जायचं असेल तर मला घटस्फोट दे आणि निघून जा. घराचे बाहेर निघाली तर तुला परत घरात घेणार नाही, असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शंकर लबडे दारू पिऊन सकाळी आला व पुन्हा शिवीगाळ करू लागला. पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी दारू पिऊन येऊन साक्षी लबडे यांना मारहाण करीत तोंडावर सिगारेटने व हातावर इस्त्रीने चटके दिले होते. त्याचप्रमाणे एक महिन्यापूर्वी पिंपळगाव खडकी येथील वन खात्याच्या जंगलात नेऊन गळ्यातील व कानातील दागिने काढून कपडे फाडत तिला मारहाण केली होती. दमदाटी करून जोवर तू तुझ्या माहेरची तुझ्या हिश्श्याची जमीन माझ्या नावावर करून देत नाही. तोवर तुला घरात घेणार नाही अशा प्रकारे मानसिक, शारीरिक व लैंगिक छळ केला. रागाच्या भरात विवाहिता साक्षी लबडे हिने टॉयलेट क्लीनर नावाचे औषध पिऊन टाकले. यासंदर्भात साक्षी शंकर लबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंकर महादेव लबडे याच्या विरोधात पारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सांगडे करीत आहेत.

Web Title: A married woman who left home for Rakshabandhan was given cigarettes iron strokes on her face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.