विद्यार्थ्याच्या डोक्यावर लोखंडी कड्याने वार, पुणे विद्यापीठातील प्रकार; तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 01:31 PM2024-04-02T13:31:46+5:302024-04-02T13:32:11+5:30

विद्यापीठातील विधी विभागासमोरील फूड कोर्ट कँटीन शेजारी सोमवारी (दि. १) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली....

A blow to the head of a student with an iron bar, type from Pune University; A case has been registered against three | विद्यार्थ्याच्या डोक्यावर लोखंडी कड्याने वार, पुणे विद्यापीठातील प्रकार; तिघांवर गुन्हा दाखल

विद्यार्थ्याच्या डोक्यावर लोखंडी कड्याने वार, पुणे विद्यापीठातील प्रकार; तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या डोक्यात लोखंडी कड्याने वार केल्याप्रकरणी तीन तरुणांवर चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विद्यापीठातील विधी विभागासमोरील फूड कोर्ट कँटीन शेजारी सोमवारी (दि. १) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत चैतन्य महेश वाघेलकर (वय २०, सध्या रा. विद्यापीठ होस्टेल, मूळ रा. पनवेल) याने फिर्याद दिली. त्यानुसार अथर्व आल्हाट, वाघेश्वर याच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहितीनुसार, फिर्यादीच्या मित्राच्या मोबाइलवर अथर्व याने दुपारी ३ वाजून २२ मिनिटांनी फोन केला आणि त्याला विधी विभागाच्या खाली येण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादीसह त्याचे काही मित्र विधी विभागाच्या समोर अथर्व याला भेटायला गेले. तेव्हा अथर्वसह इतर आरोपी तिथे हजर होते.

फिर्यादी आणि त्याचे मित्र गेल्यावर अथर्व याने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी वाघेश्वरसह एकाने फिर्यादी व त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. अथर्व अल्हाट याने तिथे पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारला. त्यानंतर वाघेश्वर याने त्याच्या हातातील लोखंडी कडे फिर्यादीच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: A blow to the head of a student with an iron bar, type from Pune University; A case has been registered against three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.