हडपसर येथील रेल्वे क्रॉसिंगवरील भुयारी मार्गासाठी पाच कोटी ८४ लाखांचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 11:23 AM2018-11-27T11:23:06+5:302018-11-27T11:28:59+5:30

ससाणेनगर सय्यद नगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर होणारी वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून दोन भुयारी मार्ग करण्याचे नियोजन आहे.

5 crore 84 lakh fund for the subway on Hadapsar areas railway crossing | हडपसर येथील रेल्वे क्रॉसिंगवरील भुयारी मार्गासाठी पाच कोटी ८४ लाखांचा निधी

हडपसर येथील रेल्वे क्रॉसिंगवरील भुयारी मार्गासाठी पाच कोटी ८४ लाखांचा निधी

Next
ठळक मुद्देवाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव मंजूर येत्या आठ ते दहा दिवसात प्रत्यक्षात भुयारी मार्गाचे काम सुरू होऊन मार्चपर्यंत खुला

हडपसर: ससाणेनगर - सय्यद नगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर होणारी वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून दोन भुयारी मार्ग करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी लागणार निधी आज रेल्वे खात्याला देण्यात आला. आमदार योगेश टिळेकर यांच्या पुढाकारातून पुणे महानगरपालिकेच्या वतीने पाच कोटी ८४ लाखांचा निधीचा धनादेश आज रेल्वे अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.त्यामुळे येथील वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्न मार्गी लागला आहे, आगामी सहा महिन्यात भुयारी मार्ग तयार होईल अशी आशा निर्माण झाली आहे.
येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल करायचा की भुयारी मार्ग हा वादाचा प्रश्न बनला होता, त्यावर उपाय म्हणून ससाणेनगर येथील रेल्वे गेट वर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ससाणेनगर व काळेपडल याच्यामध्ये तसेच रामटेकडी व ससाणेनगर याच्या मध्ये एक भुयारी मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यासाठी रेल्वे खात्याला निधी देणे गरजेचे होते.  आज पुणे महानगरपालिकेच्या वतीने पाच कोटी 84 लाख रुपयांचा निधी रेल्वेचे वरिष्ठ अभियंता  सुरेश पाखरे यांच्याकडे आमदार टिळेकरांनी सुपूर्द केला.यावेळी नगरसेवक संजय घुले, पालिकेचे उपअभियंता दाभाडे, कनिष्ठ अभियंता  थोपटे,  जीवन जाधव, हेमंत ढमढेरे, योगेश ढोरे, शांताराम जाधव आदी उपस्थित होते.
चौकट
सय्यदनगर येथे भुयारी मार्ग मंजूर पालिकेने केला होता, परंतु भूसंपादनात अडचणी आल्याने काम रखडले, येथील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला होता, म्हणून गेली 4 वर्ष राज्यशासन, पुणे महापालिका व रेल्वे खात्याकडून पाठपुरावा करून पयार्यी दोन भुयारी मार्ग मंजूर करून घेतले, या भुयारी मागार्साठी सात ते आठ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात पाच कोटी 84 लाख रुपयांचा धनादेश रेल्वे अधिकाºयांकडे सुपूर्त केला आहे येत्या आठ ते दहा दिवसात प्रत्यक्षात भुयारी मार्गाचे काम सुरू होऊन मार्चपर्यंत हा भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात येईल त्यामुळे येथील वीस वर्षांपासूनचा वाहतूककोंडीचा प्रलंबित प्रश्न  सुटण्यास मदत होणार आहे. अशी माहिती आमदार योगेश टिळेकर यांनी  दिली
 रेल्वेची व्यवस्थापक पाखरे बोलताना म्हणाले की महापालिकेकडून या भुयारी मागार्साठी निधीचा धनादेश प्राप्त झाला आहे लवकरच या भुयारी मागार्चे काम सुरू करण्यात येईल व येथील वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत रेल्वे प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहकायार्ने सकारात्मक पावले उचलली जातील.

Web Title: 5 crore 84 lakh fund for the subway on Hadapsar areas railway crossing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.