दुकानातून ४ लॅपटॉप चोरले, कॉम्प्युटर इंजिनियरला अटक

By भाग्यश्री गिलडा | Published: March 10, 2024 05:58 PM2024-03-10T17:58:01+5:302024-03-10T17:58:13+5:30

आरोपीकडून १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे लॅपटॉप हस्तगत

4 laptops stolen from shop computer engineer arrested | दुकानातून ४ लॅपटॉप चोरले, कॉम्प्युटर इंजिनियरला अटक

दुकानातून ४ लॅपटॉप चोरले, कॉम्प्युटर इंजिनियरला अटक

पुणे : कामाला असलेल्या दुकानातून लॅपटॉप चोरी करणाऱ्या संगणक अभियंत्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाकडून अटक करण्यात आलेली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एका संगणक विक्री व दुरुस्तीच्या दुकानात हार्डवेअर इंजिनिअर समीर रामनाथ थोरात (३९) याला सप्टेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान नोकरीस ठेवले होते. दुकानाचे मालक हे दुबई येथे गेले असता दुकानातील ४ लॅपटॉप व इतर साहीत्य तसेच ग्राहकांकडून कॉम्प्युटरचे साहीत्य असे परस्पर घेवून पसार झाल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आली होती.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचा मागोवा घेत सापळा रचून त्याला अटक केली आहे. त्यानंतर गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीचे लॅपटॉप हस्तगत केले आहेत. ही कामगिरी सहाय्य्क पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक व पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी केली आहे.

Web Title: 4 laptops stolen from shop computer engineer arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.