जेजुरीत ३ लाख भाविक, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करीत, भंडारा-खोब-याची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 02:26 AM2017-08-22T02:26:02+5:302017-08-22T02:26:07+5:30

3 lakh devotees in Jejuri, 'Yelkot Yelkot Jay Malhar', praising Bhandara-Khob | जेजुरीत ३ लाख भाविक, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करीत, भंडारा-खोब-याची उधळण

जेजुरीत ३ लाख भाविक, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करीत, भंडारा-खोब-याची उधळण

googlenewsNext

जेजुरी (जि. पुणे) : श्रावण महिन्यातील सोमवती अमावस्या व शेवटचा सोमवार असल्याने, जेजुरीत आज सुमारे तीन लाखांवर भाविकांनी कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. सकाळपासून ढगाळ वातावरणात रांगेत उभे राहून भाविक दर्शन घेत होते. ‘सदानंदाचा...येळकोट’च्या जयघोषाने गड दुमदुमून गेला होता.
दुपारी १ वाजता पेशव्यांच्या आदेशाने पालखी सोहळा क-हास्नानासाठी काढण्यात आला. या वेळी देवसंस्थानाचे प्रमुख विश्वस्त अ‍ॅड. वसंत नाझीरकर, सुधीर गोडसे, विश्वस्त संदीप घोणे, दशरथ घोरपडे उपस्थित होते. गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सोहळ्याने क-हास्नानासाठी कूच केले. या वेळी देवसंस्थानाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. गडातील व गडकोटाच्या सज्जातील भाविकांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करीत, भंडारा-खोबºयाची मोठ्या प्रमाणावर उधळण केली. संपूर्ण गडकोट पिवळ्याजर्द भंडा-यात न्हाऊन निघाला होता.
आल्हाददायक पावसाळी वातावरणात खांदेकरी, मानक-यांनी उत्सवमूर्तींची वजनाने खूप जड असणारी पालखी खांद्यावर लीलया पेलत गडावरून शहरातील मुख्य नंदी चौकात आणली. तेथून ऐतिहासिक चिंचबागेतील होळकर मंदिराचा मान घेऊन जानूबाई चौकमार्गे सोहळा शिवाजी चौकात आला. पुढे कोथळे रस्त्याने सोहळ्याने क-हा नदीकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी ५ वाजता क-हा नदी वा नाझारे जलाशयात पानी नसल्याने टँकरणे पाणी आणून उत्सवमूर्तींना स्नान घालण्यात आले. यानंतर सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. रात्री ७ वाजता सोहळा ग्रामदेवता जानूबाई मंदिरासमोर विसावला. येथे ग्रामस्थांनी उत्सवमूर्तींचे दर्शन घेतले. रात्री उशिरा सोहळा गडकोटावर पोहोचला. पेशव्यांनी रोजमुºयाचे वाटप करून सोहळ्याची सांगता झाली.

आल्हाददायक पावसात उत्साह शिगेला
आल्हाददायक पावसाळी वातावरणात खांदेकरी, मानक-यांनी उत्सवमूर्तींची वजनाने खूप जड असणारी पालखी खांद्यावर लीलया पेलत, गडावरून शहरातील मुख्य नंदी चौकात आणली. तेथून ऐतिहासिक चिंचबागेतील होळकर मंदिराचा मान घेऊन, जानूबाई चौकमार्गे सोहळा शिवाजी चौकात आला.
पुढे कोथळे रस्त्याने सोहळ्याने क-हा नदीकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी ५ वाजता कºहा नदी वा नाझारे जलाशयात पानी नसल्याने, टँकरणे पाणी आणून उत्सवमूर्तींना स्नान घालण्यात आले. यानंतर, सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले.

Web Title: 3 lakh devotees in Jejuri, 'Yelkot Yelkot Jay Malhar', praising Bhandara-Khob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.