राज्यात अडीच लाख जागा रिक्त - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 01:48 AM2018-10-22T01:48:08+5:302018-10-22T01:48:18+5:30

ऐन सणासुदीला वीज नाही, महागाईने जनता त्रस्त झाली आहे, प्यायला पाणी नसतानाही दुष्काळ जाहीर केला नाही, सरसकट कर्जमाफी दिली नाही

 2.5 lakh vacant seats in the state - Ajit Pawar | राज्यात अडीच लाख जागा रिक्त - अजित पवार

राज्यात अडीच लाख जागा रिक्त - अजित पवार

Next

सोमेश्वरनगर : ऐन सणासुदीला वीज नाही, महागाईने जनता त्रस्त झाली आहे, प्यायला पाणी नसतानाही दुष्काळ जाहीर केला नाही, सरसकट कर्जमाफी दिली नाही, राज्यात अडीच लाख कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्या भरल्या जात नाहीत, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ५७ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी पवार बोलत होते. प्रास्ताविकात कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला.
सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रय भरणे होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, संजय भोसले, जालिंदर कामठे, प्रमोद काकडे, भरत खैरे, शिवाजीराव भोसले, बी.जी.काकडे, तुकाराम जगताप, रघुनाथ भोसले, शहाजी काकडे, संभाजी होळकर, सतीश खोमणे, आर. एन. शिंदे, नीता फरांदे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्यासह सर्व संचालकमंडळ, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार पवार पुढे म्हणाले की, राज्य सरकारने भारनियमाचे संकट राज्यावर लादले आहे. केंद्रात व राज्यात एकच सरकार आहे. परंतु, कोळसा मिळत नसल्याचे कारण सांगितले जात आहे. नाकर्तेपणाच्या सरकारला घरी घालवण्यासाठी येत्या काळामध्ये सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा या वेळी पवार यांनी दिला.
कारखान्याच्या मालकीच्या सोमेश्वर शिक्षण संस्थेवर उशिरा लक्ष दिले. त्यामुळे संस्थेची परिस्थिती बिघडली. याकडे वेळेवर लक्ष दिले असते, तर शेजारील तालुक्यातील विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला असता, अशी कबुलीदेखील पवार यांनी या वेळी दिली. तसेच, सोमेश्वरवर असलेले कर्ज फिटले आहे, त्यामुळे सोमेश्वर राज्यात उच्चांकी दर देऊ शकला. तो आनंद सभासदांच्या चेहºयावर टिकला पाहिजे. यामुळे सर्वांगीण विचार करून विस्तारवाढीसाठी निर्णय मागे घेतला.
या वेळी आमदार भरणे यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालक विशाल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष लालासाहेब माळशिकारे यांनी आभार मानले.
।...मला विचारून ऊस घातला होता का?
अजित पवार यांना येथील शेतकºयांनी सातारा जिल्ह्यातील अनेक खासगी कारखान्यांनी गेल्या हंगामातील उसाचे बिल थकवल्याबाबत निवेदन दिले. यावर पवार यांनी, ‘मला विचारून ऊस घातला होता का’ असा सवाल व्यक्त केला. यातून लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी शेतकºयांना दिले.
।पवार आणि काकडे यांची चर्चा...
सभेत आमदार अजित पवार स्टेजवर बसलेले होते. या वेळी शेतकरी कृती समितीचे नेते गेल्या निवडणुकीतील राष्ट्रवादीचे विरोधक सतीश काकडे हे पवार यांच्या शेजारी जाऊन बसले.
पवार आणि काकडे यांच्यात बराच वेळ चर्चा सुरूहोती.
यामुळे सभागृहातील उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. यामुळे
सोमेश्वर परिसरात उलटसुलट चर्चा सुरु होती.

Web Title:  2.5 lakh vacant seats in the state - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.