स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांना केले जाणार मुक्त; ...म्हणून झाली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 02:39 PM2023-08-14T14:39:43+5:302023-08-14T14:40:30+5:30

या कैद्यांची स्वातंत्र्यदिनी अर्थात मंगळवारी (१५ ऑगस्ट) कारागृहातून मुक्तता करण्यात येणार आहे...

186 prisoners in the state will be released on Independence Day; ...so the deliverance took place | स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांना केले जाणार मुक्त; ...म्हणून झाली सुटका

स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांना केले जाणार मुक्त; ...म्हणून झाली सुटका

googlenewsNext

पुणे : कारागृहात चांगली वर्तणूक असलेल्या राज्यातील १८६ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली आहे. विशेष माफी देण्यात आलेल्या या कैद्यांची स्वातंत्र्यदिनी अर्थात मंगळवारी (१५ ऑगस्ट) कारागृहातून मुक्तता करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाने कारागृहात चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांना विशेष माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांतील १८६ कैद्यांची शिक्षा माफ केली असून, स्वातंत्र्यदिनी त्यांची मुक्तता करण्यात येणार आहे, अशी माहिती कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली.

कारागृहातील विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना तीन टप्प्यांमध्ये विशेष माफी देण्यात आली आहे. कैद्यांमधील शिस्त, त्यांचे आचरण विचारात घेऊन त्यांना भावी आयुष्यात प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षा माफ केली आहे, असे कारागृह विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून माफी योजनेेचे निकष निश्चित केले होते. राज्यातील कैद्यांची शिक्षा माफ करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या शिफारशीनुसार पहिल्या टप्प्यात १५ ऑगस्ट २०२२ रोजी २०६ कैद्यांची शिक्षा माफ केली होती. दुसऱ्या टप्प्यात २६ जानेवारी २०२३ रोजी १८९ कैद्यांची शिक्षा माफ केली असून, तिसऱ्या टप्प्यात १५ ऑगस्ट २०२३ रोजी १८६ कैद्यांची शिक्षा माफ केली आहे.

काही कैद्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. अशा कैद्यांनी शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यास त्यांची मुक्तता करण्यात येणार आहे. शिक्षेत सुनावण्यात आलेल्या दंडाची रक्कम भरण्यास असमर्थ असणाऱ्या कैद्यांची मुक्तता करण्यात येणार आहे. एकुण शिक्षेचा ६६ टक्के कालावधी पूर्ण करणाऱ्या १६७ कैद्यांना विशेष माफी देण्यात आली आहे.

...म्हणून झाली सुटका

येरवडा कारागृह -१६ आणि खुले कारागृहातील १ या कैद्यांना माफी देण्यात आली आहे. ज्या कैद्यांचे वय ६० वर्षे झाले आहे, तसेच ज्या कैद्यांनी एकूण शिक्षेचा ५० टक्के कालावधी पूर्ण केला आहे, त्यांना शिक्षेतून माफी देण्यात आली आहे. शिक्षेचा ५० टक्के कालावधी पूर्ण केलेले राज्यात ७ कैदी आहेत. काही कैद्यांनी तारुण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांनी कोणताही गुन्हा केला नाही, अशा राज्यातील दहा कैद्यांची मुक्तता करण्यात येणार आहे.

Web Title: 186 prisoners in the state will be released on Independence Day; ...so the deliverance took place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.