जिल्ह्यात १५ हजार दिव्यांग बजावणार मतदानाचा हक्क 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 08:00 PM2019-03-13T20:00:53+5:302019-03-13T20:13:10+5:30

पुणे जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांच्या संख्येत वाढ होत असून आत्तापर्यंत जिल्ह्यात १५ हजार २४१ दिव्यांग मतदारांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. 

15 thousand divyang doing the right to vote in the district | जिल्ह्यात १५ हजार दिव्यांग बजावणार मतदानाचा हक्क 

जिल्ह्यात १५ हजार दिव्यांग बजावणार मतदानाचा हक्क 

Next
ठळक मुद्दे जिल्हा प्रशासनातर्फे दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम मतदान केंद्रावर व्हील चेअर,रॅम्प किंवा इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना

पुणे: केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा दिव्यांगांच्या मतदानाची विशेष काळजी घेतली आहे.त्यामुळे अधिकाधिक दिव्यांगांना मतदान करता येणे शक्य होणार आहे. पुणे जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांच्या संख्येत वाढ होत असून आत्तापर्यंत जिल्ह्यात १५ हजार २४१ दिव्यांग मतदारांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. 
निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनातर्फे दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली.सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांची नोंदणी करून घेतली जात आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेसमोर आठवड्याभरापासून दिव्यांगांची नोंदणी केली जात असून आत्तापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात येवून १८३ दिव्यांगांनी नोंदणी अर्ज भरले आहेत.
जिल्ह्यात अंध,कर्णबधीर ,मुकबधीर आणि बहुविकलांग यांची नोंदणी करण्यात आली आहे.सुमारे दोन महिन्यापूर्वी जिल्ह्यात १३ हजार ७४९ दिव्यांग मतदार होते. परंतु,जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे त्यात सुमारे दोन हजाराने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांची संख्या १५ हजार २४२ झाली आहे.केंद्रीय निवडणूक आयोजाने सर्व दिव्यांग मतदारांना त्यांच्या मतदान केंद्रावर व्हील चेअर,रॅम्प किंवा इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना जिल्हा निवडणूक अधिका-यांना दिल्या आहेत.त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तयारी केली असून ३०० ते ४०० व्हील चेअर उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले असून त्यात आवश्यकतेनुसार वाढ केली जाणार आहे.
----------------------
 

Web Title: 15 thousand divyang doing the right to vote in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.