दक्षिण गोव्यातील हिंदूबहुल 13 मतदारसंघांतील वाढीव टक्का कुणाच्या फायद्याचा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 07:55 AM2019-04-26T07:55:54+5:302019-04-26T07:56:07+5:30

- सुशांत कुंकळयेकर मडगाव: कॅथोलिकबहुल सासष्टीत यावेळी प्रथमच मतदान 1.63 लाखावर पोहोचल्याने काँग्रेसच्या गोटात खुशीची गाजरे चघळली जात असली ...

Who is the beneficiary of the increase in voting percentage 13th Lok Sabha in South Goa? | दक्षिण गोव्यातील हिंदूबहुल 13 मतदारसंघांतील वाढीव टक्का कुणाच्या फायद्याचा?

दक्षिण गोव्यातील हिंदूबहुल 13 मतदारसंघांतील वाढीव टक्का कुणाच्या फायद्याचा?

Next

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव: कॅथोलिकबहुल सासष्टीत यावेळी प्रथमच मतदान 1.63 लाखावर पोहोचल्याने काँग्रेसच्या गोटात खुशीची गाजरे चघळली जात असली तरी प्रत्यक्षात सासष्टीतील सहा आणि मुरगावातील एक अशा एकूण सात कॅथोलिकबहुल मतदारसंघात यंदा झालेले मतदान केवळ 68.40 टक्के एवढेच असून, त्यामानाने इतर 13 हिंदूबहुल मतदारसंघात झालेले मतदान 75.48 टक्के असल्याने हे 13 मतदारसंघ कुणाबरोबर आहेत, त्याच पक्षाची दक्षिण गोव्यात सरशी होणार आहे. त्यामुळे भाजपाच्या गोटातही तसे खुशीचेच वातावरण दिसते.
2014च्या तुलनेत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातील मतांची टक्केवारी दोन टक्क्यांनी उतरली असली तरी हिंदू बहुसंख्य मते असलेल्या शिरोड्यात यावेळी ही टक्केवारी चारने वाढली असून, मडगावातही एका टक्क्याची वाढ झाली आहे. फातोडर्य़ात मागच्याएवढेच म्हणजे 73.6 टक्के मतदान झाले आहे. याउलट कॅथोलिक मतदारांची अधिक भरणा असलेल्या कुठ्ठाळीतील मतदार यावेळी तब्बल सात टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्याशिवाय बाणावली, नावेली व नुवे या तीन मतदारसंघात प्रत्येकी तीन टक्क्यांनी, कुंकळ्ळीत दोन टक्क्यांनी तर कुडतरी व वेळ्ळी येथील टक्केवारी एक टक्क्याने कमी झाली आहे.

हिंदूबहुल मतदारसंघापैकी मडकईतील मतदान यावेळी 6 टक्क्यांनी कमी झाले तर काणकोणातील मतदार 4 टक्क्यांनी कमी झाले आहे. पण ही गोष्ट भाजपाच्या पथ्यावर पडणारीच आहे. कारण यावेळी मडकईत मगोचे सुदिन ढवळीकर यांनी काँग्रेसच्या बाजूने जोर लावला होता तर काणकोण हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. सांगेतही मतदान तीन टक्क्यांनी कमी झाले असले तरी हाही मतदारसंघ अपक्ष आमदाराकडे आहे. त्या तुलनेत वास्को येथे 5 टक्क्यांनी आणि मुरगावात 4 टक्क्यांनी कमी झालेले मतदान भाजपाची थोडी चिंता वाढवू शकते.

काँग्रेसच्या वाटेत आपची अडचण
सासष्टीत यंदा 1.63 लाख एवढे मतदान झाले असले तरी आम आदमी पक्षाची रिंगणातील उपस्थिती काँग्रेसची चिंता वाढवू शकणारी आहे. आपने सासष्टीत 25 हजारांच्या आसपास मते घेतली तर काँग्रेस निश्चितच डेंजर झोनमध्ये जाईल, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक ऍड. क्लिओफात कुतिन्हो यांनी व्यक्त केली. आपचे गोव्याचे निमंत्रक आणि दक्षिण गोव्याचे उमेदवार एल्वीस गोमीस यांनी, काँग्रेसने आताच जल्लोष करू नये. 23 मे पर्यंत वाट पहावी अशा सूचक शद्बात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना नुवे, बाणावली, कुंकळ्ळी व वेळ्ळी या चार मतदारसंघांसह कुडतरीतही आपला चांगल्या प्रमाणात मते पडतील, अशी आशा व्यक्त केली. खाण पट्टय़ांतही आप चांगली कामगिरी करेल, असा विश्वास आपचे सिद्धार्थ कारापुरकर यांनी व्यक्त केला.

सावर्डेतील आघाडी कायम ठेवू: पाऊसकर
सावर्डे मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत भाजपाला 12 हजार मतांची आघाडी मिळाली होती. ही आघाडी यावेळीही आम्ही कायम ठेवू असा विश्वास सावर्डेचे सरपंच संदीप पाऊसकर यांनी व्यक्त केली. यावेळी सावर्डेत दोन टक्के मतदान कमी झाले आहे त्याचे कारण खाण व्यवसायाच्या निमित्त गोव्याबाहेरील जे मतदार या भागात वास्तव करुन होते ते परत गावात गेल्याने टक्केवारी कमी झाल्याचे दिसते. मात्र जवळपास सर्व स्थानिक मतदारांनी यावेळी मतदान केले असून ते भाजपाच्याच बाजूने जास्त प्रमाणात झाले आहे असे ते म्हणाले.

कुडचडेत भाजपाला किमान सात हजारांची आघाडी
कुडचडे मतदारसंघातून यावेळी भाजपाला किमान सात हजार मतांची आघाडी मिळेल. ही आघाडी मागच्या आघाडीपेक्षा अधिकच असेल असे मत कुडचडेचे आमदार व वीजमंत्री निलेश काब्राल यांनी व्यक्त केले. या निवडणुकीत काब्राल यांच्याकडे कुडचडे व सावर्डे या दोन मतारसंघाची जबाबदारी दिली होती. या दोन्ही मतदारसंघात भाजपा चांगली कामगिरी करेल असे मत त्यांनी व्यक्त केले. केपेतही भाजपा 2014 प्रमाणोच आघाडी घेईल असे मत भाजपाचे युवा कार्यकर्ते योगेश कुंकळयेकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, केपे नगरपालिका क्षेत्र हे प्रत्येकवेळी काँग्रेसच्या बरोबर असते. तर बाकीचे पंचायत क्षेत्र भाजपाबरोबर असते. यावेळी नगरपालिका क्षेत्रतून कमी मतदान झालेले असून त्याउलट पंचायत क्षेत्रत मतदान वाढले आहे याचा फायदा भाजपाला होऊ शकेल.

Web Title: Who is the beneficiary of the increase in voting percentage 13th Lok Sabha in South Goa?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.