वेल्लोरची निवडणूक झाली रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 05:47 AM2019-04-17T05:47:23+5:302019-04-17T05:47:34+5:30

वेल्लोर लोकसभा मतदारसंघात मतदारांना पैशाचे आमिष दाखविण्याचे अनेक प्रकार घडल्यामुळे येथे दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी होणारे मतदान निवडणूक आयोगाने रद्द केले.

Vellore election was canceled | वेल्लोरची निवडणूक झाली रद्द

वेल्लोरची निवडणूक झाली रद्द

googlenewsNext

नवी दिल्ली : वेल्लोर लोकसभा मतदारसंघात मतदारांना पैशाचे आमिष दाखविण्याचे अनेक प्रकार घडल्यामुळे येथे दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी होणारे मतदान निवडणूक आयोगाने रद्द केले. या कारवाईसाठी आयोगाने केलेल्या शिफारशीला राष्ट्रपतींनी मान्यता दिली.
मोठ्या प्रमाणात अनधिकृत रोख रक्कम, अंमली पदार्थ, दारू, सोन्याचांदीच्या दागिन्यांसह मोफत भेटवस्तूंचे आमिष येथील मतदारांना दाखविण्यात येत असल्याचा
अहवाल आयोगाला मिळाला होता. आतापर्यंत जप्त केलेल्या
२२५0 कोटींच्या अनधिकृत रोख रक्कमेपैकी केवळ तामिळनाडूतून ४९४ कोटी रोकड आयोगाने जप्त केली आहे. आयोगाने सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे वेल्लोरमधील मतदान रद्द करण्याची शिफारस केली होती.

Web Title: Vellore election was canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.