'संविधान वाचविणे ही काळाची गरज'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:54 AM2019-04-17T00:54:16+5:302019-04-17T00:56:41+5:30

पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी पक्षाला राष्ट्रीय कॉग्रेसने जाहिर पाठिंबा दिला आहे.

'The need of the hour to save the constitution' | 'संविधान वाचविणे ही काळाची गरज'

'संविधान वाचविणे ही काळाची गरज'

googlenewsNext

वसई : पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी पक्षाला राष्ट्रीय कॉग्रेसने जाहिर पाठिंबा दिला आहे. या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी नुकतीच एक सभा वसईत पापडी येथील कॅथलिक जिमखाना येथे घेतली होती.या सभेत जेष्ठ कार्यकर्ते व कामगार नेते मार्कुस डाबरे यांनी, संविधानाला घातक ठरणा-या भाजपाचा बिमोड करण्याचे आवाहन करत, संविधान बचाव हे अभियान राबविण्याची गरज असल्याचे सांगीतले. त्यासाठी भाजपाला विरोध करा असे त्यांनी सांगीतले. यावेळी डॉमनिक डिमेलो, बिना फुर्ट्याडो, ओनिल आल्मेडा, प्रविणा चौधरी, नारायण मानकर, अ‍ॅड.नोवेल डाबरे, व्हलेटाईन मिरची, व्हिसेंट आल्मेडा आदि मान्यवरांसह साडेतीनशे कार्यकर्ते उपस्थित होते.
बॅसिन कॅथलिक बॅकेचे चेअरमन ओनिल आल्मेडा यांनी सुरवातीलाच या सभेच्या आयोजनाचे उद्दीष्ट स्पष्ट करताना, निवडणूकीच्या पाशर््वभूमीवर घडणा-या घटनांची माहिती देत कॉग्रेसची भूमिका स्पष्ट केली. भाजपाकडून लोकशाहिची गळचेपी केली जात असून त्यासाठी प्रसिद्धी माध्यमे व कायदा हाती धरून कुटनीतीचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारांच्या पाठीशी राहून कॉग्रेसने निवडणूकित जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयावर ठाम राहण्याचे आवाहन केले. त्यासाठी महाआघाडीच्या उमेदवाराला मतदान करणार असून जाहिर पाठींबा असल्याचे सांगीतले. अ‍ॅड. नोव्हेल डाबरे यांनीही यावेळी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या व जगात नावाजल्या गेलेल्या संविधानवर आंच येऊ नये यासाठी संविधान बचाव अभियान राबविण्याचे उपस्थीतांना आवाहन केले.

Web Title: 'The need of the hour to save the constitution'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.