माझी मूलं लहान नाहीत, स्वतः निर्णय घेतील : सुनेत्रा पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 04:41 PM2019-03-08T16:41:58+5:302019-03-08T16:46:43+5:30

पार्थ सध्या राजकारणात सक्रिय झाले असून त्यांना मावळ लोकसभा उमेदवारीत रस आहे  असाही सूर आहे. अर्थात राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून याबाबत अजून तरी कोणतेही अधिकृत वक्तव्य नाही. त्यामुळे पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्याची चौथी पिढी राजकारणात सक्रिय होणार का याविषयी राज्यात  उत्सुकता आहे. 

My children are not small, they will make their own decisions: Sunetra Pawar | माझी मूलं लहान नाहीत, स्वतः निर्णय घेतील : सुनेत्रा पवार 

माझी मूलं लहान नाहीत, स्वतः निर्णय घेतील : सुनेत्रा पवार 

Next

पुणे : माझी मूलं आता लहान नाहीत. त्यामुळे राजकीय प्रवेश आणि त्यांच्या संदर्भातले सर्व निर्णय ते स्वतः घेतील अशी प्रतिक्रिया बारामती सुनेत्रा पवार यांनी नोंदवली आहे. पुण्यात वाडेश्वर कट्ट्यावर माध्यमांसोबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

          लोकसभा निवडणुकांचे वारे वाहायला लागल्यापासून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि जय यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली आहे. पार्थ सध्या राजकारणात सक्रिय झाले असून त्यांना मावळ लोकसभा उमेदवारीत रस आहे  असाही सूर आहे. अर्थात राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून याबाबत अजून तरी कोणतेही अधिकृत वक्तव्य नाही. त्यामुळे पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्याची चौथी पिढी राजकारणात सक्रिय होणार का याविषयी राज्यात  उत्सुकता आहे. 

          याच विषयावर सुनेत्रा यांना विचारले असता त्या म्हणाल्या, 'आमच्याकडे प्रत्येकाला विचारांचे स्वातंत्र्य आहे. आता माझी मूलं लहान नाहीत. त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेतील. व्यक्ती ज्या संस्कारात वाढतात त्यानुसार निर्णय घेतात. शिवाय सध्याचा जमाना वेगळा आहे. त्यामुळे मुलांनी घेतलेले निर्णय आई वडिलांना मान्य करावे लागतात. आम्हालाही ते मान्य असतील. 

Web Title: My children are not small, they will make their own decisions: Sunetra Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.