'खासदार गीतेंनी सहा वेळा मतदान केले नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 12:11 AM2019-04-15T00:11:22+5:302019-04-15T00:13:55+5:30

आपल्याला डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक प्रशासनाने युवक व युवतीचे फोटो लावून मतदान करावे, असे आवाहन केले आहे.

'MPs do not vote six times' | 'खासदार गीतेंनी सहा वेळा मतदान केले नाही'

'खासदार गीतेंनी सहा वेळा मतदान केले नाही'

Next

माणगाव : आपल्याला डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक प्रशासनाने युवक व युवतीचे फोटो लावून मतदान करावे, असे आवाहन केले आहे. मात्र, आपल्या विभागातील खासदार गीते यांनी सहा वेळा मतदान केले नाही यांचा आदर्श तरु णांनी घेऊ नये, असे प्रतिपादन रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांनी लोणेरे येथे महाआघाडीच्या प्रचारसभेत के ले.
या वेळी सुनील तटकरे यांनी मोदी सरकार, शिवसेना आणि अनंत गीते यांच्यावर प्रखर शब्दात टीका केली. ते म्हणाले की, कष्टकरी जनतेला डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काम केले. अमेरिका, रशियासारखे बलाढ्य देश समोर असताना इंदिरा गांधींनी ‘भारत भी कुछ कम नही’ असे दाखवून दिले. राजीव गांधी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी केली. नरसिंहराव, मनमोहन सिंग यांनी देशाला स्थिरता देण्याचे काम केले; पण मोदी सरकारने जनतेला फसविण्याचे काम केले. या सरकारचे फक्त राज्यघटना बदलण्याचे काम सुरू असल्याचे तटकरे यांनी सांगितले.


उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना सुनील तटकरे यांनी, सहा महिन्यांपूर्वी मोदींचा खरपूस समाचार घेणारे उद्धव ठाकरे आता मोदींसारखा पंतप्रधान होणार नाही, असे वक्तव्य करतात. महिनाभरात असे काय झाले की, शिवसेना नेतृत्वाला मोदींची स्तुती करावी लागते, असा सवाल उपस्थित केला. आज महामार्ग चौपदरीकरणात ज्यांच्या जमिनी संपादित केल्या, त्यांना भरघोस नुकसानभरपाई मिळते आहे, याचे श्रेय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचेच आहे. यूपीए सरकारच्या काळात त्यांनी यासाठी प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले. गोरेगाव, देवली, लोणेरसाठी आपण पाणी योजना आणल्या. आता खासदार झालो तर महामार्ग चौपदरीकरणाचे काम गतिमान करेनच; पण टोलदेखील रद्द करेन, अशी ग्वाही देऊन आता फक्त एकदा संधी द्या, तुम्हाला पुन्हा मागे वळून पाहावे लागणार नाही, असा विश्वास सुनील तटकरे यांनी दिला.

या प्रचारसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर, तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा संगीता बक्कम, काँग्रेसचे नेते श्रीनिवास बेंडखळे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, तालुकाध्यक्ष विलास सुर्वे आदी उपस्थित होते.

Web Title: 'MPs do not vote six times'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.