गेल्या निवडणुकीत रिंगणात होते ३,२३५ अपक्ष, निवडून आले केवळ तीन!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 04:12 AM2019-04-14T04:12:31+5:302019-04-14T04:13:13+5:30

देशाचे राजकारण राज्याराज्यात युती-आघाडीद्वारे सुरू राहण्यापासून दूर जात राष्ट्रीय पक्षांनी एकहाती सत्ता मिळविण्यास गेल्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले.

In the last election there were 3,235 independent candidates, elected only three! | गेल्या निवडणुकीत रिंगणात होते ३,२३५ अपक्ष, निवडून आले केवळ तीन!

गेल्या निवडणुकीत रिंगणात होते ३,२३५ अपक्ष, निवडून आले केवळ तीन!

Next

- संदीप आडनाईक 

नवी दिल्ली : देशाचे राजकारण राज्याराज्यात युती-आघाडीद्वारे सुरू राहण्यापासून दूर जात राष्ट्रीय पक्षांनी एकहाती सत्ता मिळविण्यास गेल्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले. याहीवेळेस एकाच राजकीय पक्षाला एकहाती सत्ता मिळेल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज असताना अपक्षांची कामगिरी मात्र खालावल्याचे दिसत आहे.
१९५७च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे ४२ अपक्ष उमेदवार विजयी झाले होते, त्या तुलनेत २0१४ च्या निवडणुकीत सर्वात कमी म्हणजे अवघे ३ अपक्ष उमेदवार विजयी झाले. यावरून राष्ट्रीय पक्षांना सर्वाधिक पसंती जनतेने दिल्याचे स्पष्ट होते. 10,635 अपक्ष उमेदवारांनी १९९६ ची निवडणुक लढविली होती. अपक्षांनी लढविण्याचा हा रेकॉर्ड आहे. अर्थात, त्यापैकी १0,६२६ उमेदवारांना अनामत रक्कमही गमवावी लागली.
479 अपक्ष उमेदवार १९६२च्या निवडणुकीत रिंगणात होते. ही आतापर्यंत सर्वांत सर्वात कमी संख्या होती.
>अपक्ष उमेदवारांचा आलेख उतरता । सर्वात कमी २0१४ मध्ये, १९५७ मध्ये सर्वाधिक अपक्ष विजयी झाले.
>वर्ष उमेदवार विजयी अनामत रक्कम टक्केवारी
जप्त झालेले
१९५२ ५३३ ३७ ३६0 ६७.५४%
१९५७ ४८१ ४२ ३२४ ६७.३६%
१९६२ ४७९ २0 ३७८ ७८.९१%
१९६७ ८६६ ३५ ७४७ ८६.२६%
१९७१ ११३४ १४ १0६६ ९४.00%
१९७७ १२२४ ९ ११९0 ९७.२२%
१९८0 २८२६ ९ २७९४ ९८.८७%
१९८४ ३७९७ ५ ३७५२ ९८.८२%
>वर्ष उमेदवार विजयी अनामत रक्कम टक्केवारी
जप्त झालेले
१९८९ ३७१२ १२ ३६७२ ९८.९२%
१९९१ ५५४६ ५ ५५२९ ९९.६९%
१९९६ १0,६३५ ९ १0६२६ ९९.७१%
१९९८ १९१५ ६ १८९८ ९९.११%
१९९९ १९४५ ६ १९२८ ९९.१३%
२00४ २३८५ ५ २३७0 ९९.३७%
२00९ ३८३१ ९ ३८0६ ९९.३६%
२0१४ ३२३५ ३ ३२१८ ९९.५१%

Web Title: In the last election there were 3,235 independent candidates, elected only three!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.