मावळ परिसरात कुत्री येतात कोठून? नागरिकांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 03:04 AM2018-04-07T03:04:52+5:302018-04-07T03:04:52+5:30

मावळ तालुक्यासह तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा आदी महत्त्वाच्या शहरातील अनेक भागांमध्ये, आजूबाजूला वसलेल्या महत्त्वाच्या गावांमध्ये तसेच मुख्य रस्ता व जुना मुंबई-पुणे महामार्गावर भटक्या व मोकाट कुत्र्यांचा वावर जास्त असला, तरी त्याच बरोबर मावळातील अनेक दुर्गम भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सकाळी भर रस्त्यावर अचानक २५ ते ३० कुत्र्यांचे टोळके दिसत आहे.

 Where do the dogs come from Maval area? Citizen's question | मावळ परिसरात कुत्री येतात कोठून? नागरिकांचा सवाल

मावळ परिसरात कुत्री येतात कोठून? नागरिकांचा सवाल

Next

कामशेत - मावळ तालुक्यासह तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा आदी महत्त्वाच्या शहरातील अनेक भागांमध्ये, आजूबाजूला वसलेल्या महत्त्वाच्या गावांमध्ये तसेच मुख्य रस्ता व जुना मुंबई-पुणे महामार्गावर भटक्या व मोकाट कुत्र्यांचा वावर जास्त असला, तरी त्याच बरोबर मावळातील अनेक दुर्गम भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सकाळी भर रस्त्यावर अचानक २५ ते ३० कुत्र्यांचे टोळके दिसत आहे.
तालुक्यातील सर्वच भागात सकाळी सकाळी नोकरदार वर्ग विद्यार्थी व दुग्ध व्यावसायिक हे लगबगीत असतात. कामावर तसेच शाळेत विद्यालयात जाण्याच्या गडबडीत असताना भर रस्त्यात अचानक अवतरणाऱ्या अज्ञात व वाहनाच्या मागे धावणाºया मोकाट कुत्र्यांमुळे दुचाकीस्वारांना विशेष करून त्रास होत असून, यातून किरकोळ अपघात ही घडत आहेत. आपापल्या गावांमध्ये किती मोकाट कुत्री आहेत, याचा पुरेसा अंदाज शहरातील नागरिकांसह विविध गावातील गावकºयांना असताना त्या कुत्र्यांच्या व्यतिरिक्त हे वाढीव कुत्री येतात कोठून यावर सध्या परिसरात चर्चा सुरू आहे. कामशेत ग्रामपंचायत सरपंच सारिका घोलप यांना छत्रपती नेटवर्क मावळ या युवकांच्या संघटनेने कामशेतमध्ये असणाºया मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशा आशयाचे निवेदन दिले आहे.
मावळातील शहर व गावागावांमध्ये मुख्य रस्त्यावर रोज सकाळी मोठ्या प्रमाणात अनोळखी कुत्र्यांची टोळी आढळून येत असून, या कुत्र्यांना येथे कोणी सोडले असा प्रश्न नागरिक आपापसात विचारात आहेत. मोठ्या शहरांमधून पकडलेली मोकाट कुत्री मावळातील अनेक खेडेगावांमध्ये रात्री अथवा पहाटेच्या सुमारास सोडली जात असल्याचा आरोप खेडेगावातील नागरिक करीत आहेत. या मोकाट जनावरांमुळे ग्रामीण जनजीवन विस्कळीत होत आहे. शहरातील कुत्री अशाप्रकारे ग्रामीण भागांमध्ये मोठ्या संख्येने सोडून येथील शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवन धोक्यात येत असून मुख्य रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या शिवाय नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.

पशुधन विकास अधिकारी प्रभारी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी ३ कामशेत मावळ डॉ. रूपाली दडके एखादा कुत्रा चावल्यास जखम ताबोडतोब पाण्याने स्वच्छ धुवायची, कोणतीही पट्टी न बांधता अथवा टाके न घालता २४ तासांच्या आत श्वानदंशाची लस घ्यावी. यात पहिली लस चावल्यानंतर लगेच दुसरी लस तिसºया दिवशी व त्यानंतर सातव्या दिवशी तिसरी लस घेणे गरजेचे आहे. याच बरोबर आपल्याकडे असणाºया पाळीव कुत्र्यांना ही श्वानदंशाची लस टोचून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
मावळ तालुक्यात मोकाट कुत्रे हा प्रश्न गंभीर असून यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींना पत्राद्वारे या मोकाट जनावरांवर कारवाई करण्याच्या सूचना लवकरच देण्यात येतील, असे मावळचे प्रभारी गट विकास अधिकारी अप्पासाहेब गुजर यांनी सांगितले.

तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये पिसाळलेली व मोकाट कुत्री इतर जनावरे यांच्यावर प्रतिबंध करण्यासाठी, त्यांना पकडण्यासाठी व या जनावरांवर रोख ठेवण्यास ग्रामपंचायत प्रशासनाकडे अशी यंत्रणा नाही. याची शासनाने दखल घेऊन प्रशासनाने तशी तरतूद करावी. या मोकाट व पिसाळलेल्या जनावरांवर कारवाई अथवा बंदोबस्त करण्यासाठी शासनाने यंत्रणा राबवावी व स्थानिक नागरिकांना होणारा त्रास त्यांनी दूर करावा, अशी मागणी सर्वच स्तरावरून होत आहे. अन्यथा लहान मुलांसह मावळवासीयांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे.

Web Title:  Where do the dogs come from Maval area? Citizen's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.