पदपथावर वाहन पार्किंग, वाहतूकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:50 AM2018-11-11T00:50:55+5:302018-11-11T00:51:21+5:30

लोणावळा : रस्ता रुंदीकरण करूनही वाहतूककोंडीचा प्रश्न ‘जैैसे थे’

Vehicle parking on footpath, traffic lock | पदपथावर वाहन पार्किंग, वाहतूकीचा खोळंबा

पदपथावर वाहन पार्किंग, वाहतूकीचा खोळंबा

Next

लोणावळा : लोणावळा शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कुमार चौकातून प्रवेश केल्यानंतर रेल्वे पूल व मॉल समोर होणारी वाहतूककोंडीची समस्या सोडविण्याकरिता लोणावळा नगर परिषदेने रस्त्याच्या कडेला असलेला पदपथ तोडून त्याठिकाणी रस्ता रुंदीकरण केले खरे, मात्र या जागेचा वापर सध्या वाहन पार्किंगसाठी होऊ लागला असल्याने याठिकाणी पुन्हा नव्याने वाहतूककोंडी होत आहे, तर पायी चालणाऱ्या नागरिकांना धोकादायकरित्या रस्त्यावरुन चालावे लागत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

कुमार चौक ते मावळ पुतळा चौकदरम्यान रस्ता रुंद करण्यात आला असला तरी रेल्वे उड्डाण पूल व मॉल समोरील वळणावर रस्ता अरुंद असल्याने या भागात सतत वाहतूक कोंडी होत असते, ही कोंडी सोडविण्यासाठी नगर परिषदेने जीर्ण झालेल्या पदपथाचा बळी देत त्याठिकाणी रस्ता रुंदीकरण केले़ यामुळे रुंद झालेल्या रस्त्यावर आता बेशिस्त वाहनचालक, स्थानिक व पर्यटक वाहने उभी करु लागल्याने सदरच्या जागेवर वाहन पार्किंगचे अतिक्रमण झाले आहे. या भागात पायी चालणारे नागरिक व पर्यटकांची वर्दळ ध्यानात घेता पदपथ असणे अति गरजेचे आहे. पदपथ तुटल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालत रस्त्यावरुन पायी चालावे लागत आहे.
वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी रेल्वे पूल व मॉल समोरील जागेवर रुंदीकरण करण्यात आलेल्या जागेवर बेकायदा वाहने उभी करणाºया वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी सुजाण नागरिक करत आहेत.
सध्या सुटीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे लोणावळा परिसरात पर्यटकांची गर्दी होत आहे. त्यांनाही वाहतूककोंडीचा फटका बसत आहे. लोणावळा शहरातील कोंडी दूर करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाºयांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करावी. कारवाईदरम्यान, कोणीही राजकीय हस्तक्षेप करू नये, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दंडात्मक कारवाई : पोलिसांना सूचना
वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याकरिता सदर जागेवरील तुटलेला पदपथ काढत रस्ता रुंद करण्यात आला होता. मात्र सदर जागेचा वापर वाहतुकीऐवजी वाहने उभी करण्यासाठी होऊ लागल्याने या जागेवर पुन्हा चांगल्या पद्धतीचा पदपथ बनविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली. तसेच याठिकाणी वाहने उभी करणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत वाहतूक पोलिसांना सूचित करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Web Title: Vehicle parking on footpath, traffic lock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.