मुंबई-पुणे महामार्गावर वाहनाच्या धडकेने दोन महिलांचा मृत्यू; वृद्ध चालकावर गुन्हा दाखल

By नारायण बडगुजर | Published: June 17, 2023 03:22 PM2023-06-17T15:22:41+5:302023-06-17T15:25:21+5:30

दापोडीत हा अपघात सायंकाळी पावणेसातच्या सुमारास झाला...

Two women killed in vehicle collision on Mumbai-Pune highway; A case has been registered against the elderly driver | मुंबई-पुणे महामार्गावर वाहनाच्या धडकेने दोन महिलांचा मृत्यू; वृद्ध चालकावर गुन्हा दाखल

मुंबई-पुणे महामार्गावर वाहनाच्या धडकेने दोन महिलांचा मृत्यू; वृद्ध चालकावर गुन्हा दाखल

googlenewsNext

पिंपरी : रस्ता ओलांडत असलेल्या वृद्धेला आणि एका महिलेला चारचाकी वाहनाने धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. धडकेने वृद्धेसह एका महिलांचा मृत्यू झाला. मुंबई-पुणे महामार्गावर दापोडी येथे गुरुवारी (दि. १५) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास हा अपघात झाला.

राजू इश्वरलाल रांका (वय ६९, रा. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने शुक्रवारी (दि. १६) भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची ६९ वर्षीय आई आणि ४३ वर्षीय मावस बहीण हे दापोडी येथे रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी आरोपीच्या ताब्यातील चारचाकी वाहनाने फिर्यादी महिलेच्या आई व मावस बहिणीला धडक दिली. यात त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले तपास करीत आहेत.

Web Title: Two women killed in vehicle collision on Mumbai-Pune highway; A case has been registered against the elderly driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.