लोणावळ्यात ट्रकची कारला धडक, भीषण अपघातात 2 जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 11:14 AM2017-08-23T11:14:22+5:302017-08-23T11:20:49+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकची कारला धडक बसल्यामुळे दोन जण जखमी झाले आहेत.  कामशेतजवळील पवना पोलीस चौकीसमोर हा अपघात घडला आहे. 

Two people were injured in a truck accident in Lonavla | लोणावळ्यात ट्रकची कारला धडक, भीषण अपघातात 2 जण जखमी 

लोणावळ्यात ट्रकची कारला धडक, भीषण अपघातात 2 जण जखमी 

Next

लोणावळा, दि. 23 - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकची कारला धडक बसल्यामुळे दोन जण जखमी झाले आहेत.  कामशेतजवळील पवना पोलीस चौकीसमोर हा अपघात घडला आहे.  बुधवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार द्रुतगती महामार्गावरुन मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी हुंडाई कार क्र. (M H04/HN 4923) ही कामशेतजवळील पवना पोलीस चौकी येथे आली असता या गाडीचा पुढील बाजूचा डावीकडील टायर अचानक फुटला. यावेळी चालक गाडी रस्ताच्या कडेला घेत असताना मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकची (MH 09/L 858) कारला जोरात धडक बसली. यावेळी कारमधील सौरब कुमार हे गंभीर जखमी झाले असून कारचालक किरकोळ जखमी झाला आहे.  अपघाताची माहिती समजल्यानंतर अपघातस्थळी धाव घेत महामार्ग पोलीस व आयआरबीच्या कर्मचार्‍य‍ांनी दोन्ही जखमींना रुग्णवाहिकेतून लोकमान्य हॉस्पिटल (निगडी) येथे दाखल केले आहे. 

Web Title: Two people were injured in a truck accident in Lonavla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात