धाडगेवस्तीवर राणूबाईमळा रस्त्यावर दोन जणांवर तलवार व लाकडी दांडक्याने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 08:29 PM2018-04-18T20:29:18+5:302018-04-18T20:29:18+5:30

धाडगेवस्ती येथे चाकण-राणूबाई मळा रस्त्यावर तलवार व लाकडी दांडक्याने मारहाण करून दोघांना जखमी केल्या प्रकरणी राणूबाई मळ्यातील तीन जणांवर आज ( दि. १८ ) रात्री पावणेदोनच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली. 

two people were attacked by a sword and a wooden rack | धाडगेवस्तीवर राणूबाईमळा रस्त्यावर दोन जणांवर तलवार व लाकडी दांडक्याने हल्ला

धाडगेवस्तीवर राणूबाईमळा रस्त्यावर दोन जणांवर तलवार व लाकडी दांडक्याने हल्ला

Next

 चाकण  - धाडगेवस्ती येथे चाकण-राणूबाई मळा रस्त्यावर तलवार व लाकडी दांडक्याने मारहाण करून दोघांना जखमी केल्या प्रकरणी राणूबाई मळ्यातील तीन जणांवर आज ( दि. १८ ) रात्री पावणेदोनच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना मंगळवारी ( दि. १७ ) रात्री पावणेसातच्या सुमारास धाडगेवस्ती रोडवर घडली. या घटनेत अक्षय बिरदवडे व संतोष बिरदवडे हे जखमी झाले आहेत.ओंकार दत्तात्रय बिरदवडे ( वय २१, रा. राणूबाईमळा, चाकण ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आकाश लेंडघर, प्रतीक लेंडघर व सूरज लेंडघर ( सर्व रा. राणूबाईमळा, चाकण ) या तिघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८५/२०१८, भादंवि कलम ३४१, ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४, ४२७, आर्म ऍक्ट ४ व २७ अन्वये आज रात्री पावणेदोनच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी कि, मंगळवार ( दि. १७ ) रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास धाडगेवस्ती येथील ओढ्याजवळ फिर्यादी ओंकार व त्याचा चुलत भाऊ प्रवीण हे दोघे दुचाकी क्रमांक ( एमएच १४ एफ व्ही ५८३८ ) वरून घरी जात असताना आकाश लेंडघर व प्रतीक लेंडघर यांनी संगनमताने त्यांच्या दुचाकीला दुचाकी आडवी मारून पुढे जाण्यास प्रतिबंध करून शिवीगाळ व दमदाटी केली. प्रतीक याने त्याच्या हातातील तलवारीने ओंकार च्या पाठीवर व प्रवीणच्या कानावर, कानामागे वार करून जखमी केले. व दुचाकीवर दगड टाकून दुचाकीचे नुकसान केले. यावेळी भांड सोडविण्यासाठी आलेले संतोष बिरदवडे व अक्षय बिरदवडे यांना आकाश, प्रतीक व सुरज यांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून प्रतीक याने तलवारीने अक्षयच्या हाताच्या मनगटावर व संतोषच्या कानावर हाताच्या बोटावर वार करून जखमी केले. सदर फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार पुढील तपास करीत आहेत. 

Web Title: two people were attacked by a sword and a wooden rack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.