आंदोलनातील मृतांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 02:56 AM2017-08-10T02:56:48+5:302017-08-10T02:56:48+5:30

पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनाला सहा वर्षे पूर्ण होत असून, शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सकाळी १० वाजता बौर एक्स्प्रेस हायवेपासून ज्योत पेटवून श्रद्धांजली स्थळी आणली.

 Tribute to the dead in the movement | आंदोलनातील मृतांना श्रद्धांजली

आंदोलनातील मृतांना श्रद्धांजली

Next

येळसे : पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनाला सहा वर्षे पूर्ण होत असून, शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सकाळी १० वाजता बौर एक्स्प्रेस हायवेपासून ज्योत पेटवून श्रद्धांजली स्थळी आणली. येळसे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात तीन शहीद कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, श्यामराव तुपे यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी मावळ तालुक्याचे आमदार संजय तथा बाळा भेगडे, आमदार दिगंबर भेगडे, भारतीय किसान संघाचे अध्यक्ष शंकर शेलार, एकनाथ टिळे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, बंद जलवाहिनी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम ,भास्कर म्हाळसकर, पांडुरंग ठाकर, प्रशांत ढोरे, राजू खाडभोर, भारत ठाकूर, रवींद्र भेगडे, अलका धानिवळे, रघुवीर शेलार, अजित अगळे, बाळासाहेब जाधव, गुलाब वरघडे, जिजाबाई पोटफोडे, निकिता घोटकुले, सुरेखा जाधव, संदीप भुतडा, बबनराव कालेकर, शंकर लोखंडे, अंकुश पडवळ, किसन घरदाळे, अनिल तुपे, किसन खैरे, अमित कुंभार, गणेश ठाकर, श्यामराव शिंदे, मुकुंद ठाकर, नवनाथ ठाकर, रमेश आडकर, लक्ष्मण भालेराव, सचिन मोहिते, अनिल साबळे, गणेश गावडे, वंसत काळे, नंदू कालेकर, सचिन साबळे व हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी शेतकºयांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भांत सकारात्मक निर्णय घेऊन खटले मागे घेण्यात येतील, असे आश्वासन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिले.
या वेळी पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी म्हणाले, पवना बंद जलवाहिनी ज्या वेळी कायमची रद्द झाल्याची घोषणा होईल त्या वेळी खºया अर्थाने अंदोलनादरम्यान शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण होईल. या वेळी प्रस्ताविक श्री. पांडुरंग ठाकर यांनी केले व सूत्रसंचालन विश्वनाथ जाधव यांनी केले.
या वेळी तळेगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

बंदिस्त जलवाहिनीला याआधीही आमचा विरोध कायम होता व यापुढे ही बंद जलवाहिनीला विरोध कायम राहिल. काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून बंद जलवाहिनीचा प्रकल्प कायमचा रद्द करण्याची मागणी शिष्टमंडळाला घेऊन करण्यात येईल. शेतकऱ्यांना तत्कालीन शासनाने नोंदविण्यात आलेले गुन्हे लवकरच मागे घेण्यात येतील.
- बाळा भेगडे, आमदार

Web Title:  Tribute to the dead in the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.